अनुसूचित जातीतून आलेले नितीन राऊत मूळचे नागपूरचे आहेत. १९९९ पासून त्यांनी शहराच्या उत्तर नागपूर मतदारसंघातून पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ते महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे ऊर्जामंत्री होते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वप्रथम मतदानाचा हक्क काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी बजावला आहे. नितीन राऊत यांचे मत बाद करण्याची मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. माझा नंबर आधी असताना…
आज नागपुरात (Nagpur) आश्चर्याचा सुखद धक्का देणारी ही घटना घडली! आपल्या मतदार संघात कामाची पाहणी करण्यासाठी फिरणारे आमदार आणि माजी मंत्रीच शाळेत जाणाऱ्या मुलांच्या ऑटो रिक्षाला धक्का द्यायला धावले तेव्हा…
सातारा जिल्ह्यात एका कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. महावितरणचा वर्ग- दाेनचा अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सर्वसामान्यांना एक मोठा झटका बसला आहे. महावितरणने वीजेच्या दरात प्रति युनिट 25 पैशांची वाढ करत ग्राहकांना झटका दिला आहे. वीज दरवाढीसाठी महावितरणने एफएससी म्हणजेच इंधन समायोजन शुल्कचा आसरा घेतला आहे.…
मुंबई ऊर्जा मार्ग या मुंबईतील आगामी महत्त्वपूर्ण पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्पाने मुंबईतील तरूणांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यासाठी सिमेन्स ऐक्य एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्टसोबत सहयोग केल्याची घोषणा केली.
पुणे शहरातील टिळक रोडवर सुरु असलेल्या ड्रेनेज पाइपलाईनच्या कामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम करताना शुक्रवारी (दि. २७) रात्री ११.५५ वाजता महावितरणची उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे सदाशिव पेठ, टिळक रोड व…
गेल्या बावीस तेवीस दिवसांपासून राज्यात कुठेही भारनियमन नाही. राज्यात भारनियमनाच्या केवळ वावड्या उठवल्या जात आहेत. यापुढेही राज्यात भारनियमन होवू देणार नसल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांनी लाखो रुपयांची वीज बिलं थकवल्याची बाब समोर आली आहे. या थकबाकीदार 'व्हीआयपी' ग्राहकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या परिसरामध्ये रविवारी (ता. ८) पहाटे चार ते सहा…
अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्रांची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ आकडे काढण्यात आले.
‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून…
राजकारण काय करायचे ते करा, पण आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बीड जिल्ह्यातील परळी येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने महावीतरणाच्या निषेधात तिरडी आंदोलन करण्यात आले. भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या विजेची अडचण दूर व्हावी व त्यांना शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी सोलार प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम हाती घेतले. शनिवारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी…
राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुचाकी, चारचाकी ई-वाहनांसाठी खरेदीमध्ये मोठी सवलत मिळत असून, इलेक्ट्रिक चार्जिंगद्वारे स्वस्त इंधन देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर ही काळाची…
राज्यातील सात औष्णिक विद्युत केंद्र पैकी पाच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्य सरकारने आधीच नियोजन न केल्याने हे संकट उद्भवले का…
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर, भोकर या तेलंगणा सीमावर्ती भागात असणाऱ्या शेतकऱ्यांनी या विजेच्या 'शॉक'पासून आपल्या पिकांना, स्वतः ला वाचवण्यासाठी तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
भुसावळ विभागातील २२ पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल ३ कोटी ४२ लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. या सर्व योजना भुसावळ व जामनेर तालुक्यातील आहेत. यामुळे त्यांच्यावर अवलंबून गावांचा…