Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar News : पोलादपूर चेक नाक्यावर वनविभागाची मोठी कारवाई! खैराच्या लाकडासह तिघांना रंगेहात पकडले

महाड-पोलादपूर मार्गावर वनविभागाने अवैध खैर लाकूड वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडली. या कारवाईत ६१,४२५ रुपयांचा ३.१५ घनमीटर खैर माल जप्त करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 08:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाबळेश्वर : महाड-पोलादपूर मार्गावरील चेक नाक्यावर वनविभागाने धाडसी कारवाई करत अवैध खैर लाकडाची वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडली आहे. या कारवाईत तब्बल ६१,४२५ रुपयांचा ३.१५ घनमीटर खैर माल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mira Bhayandar मध्ये मतदार याद्यांचे ‘सुपर सखोल’ पुनरावलोकन; कर्मचारी २० दिवसांपासून पूर्णवेळ कार्यरत, शासकीय कामकाजावर परिणाम

बुधवार, २२ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. महाड-पोलादपूर चेक नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक शालिनी कोहळे यांनी संशयित अशोका लेलॅण्ड पिकअप (क्र. MH-01-LA-8878) गाडीला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेत कोहळे यांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग केला आणि काही अंतरावर गाडी अडवण्यात यश मिळवले.

वाहनाची तपासणी केली असता, त्यात अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेला खैर लाकडाचा साठा आढळून आला. यानंतर वनविभागाने तातडीने कारवाई करत वाहनासह माल जप्त केला. या प्रकरणी सुनिल ज्ञानदेव मर्देकर (वय ४५, रा. ओझरे, ता. जावली), विठ्ठल रामचंद्र चव्हाण (वय ४७, रा. कामठी, जि. सातारा) आणि धनाजी संपत पवार (वय ५०, रा. वेळे, जि. सातारा) या तिघांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. आरोपींनी प्राथमिक चौकशीत आपला गुन्हा कबूल केला असून, त्यांच्यावर वनगुन्हा क्र. ०१/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिकअप गाडीही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सरनाईकांच्या मतदारसंघात सदावर्ते आक्रमक; रिक्षाचालकांशी संवाद, मेहता भेटीने राजकीय रंग, मनसेसोबत रस्त्यावर संघर्ष

ही कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ आणि महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनरक्षक शालिनी कोहळे यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई यशस्वी ठरली. या प्रकरणाचा पुढील तपास महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे करत आहेत. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना इशारा दिला आहे की अवैध लाकूड वाहतूक, शिकार किंवा वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. जंगलात प्लास्टिक कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे किंवा अतिक्रमण करणे यावरही कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Raigad news major action by the forest department at the poladpur check post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • poladpur news

संबंधित बातम्या

Mahabaleshwar News : पंचायत समितीच्या मासिक सभेत विकासकामा सह पाणीटंचाई व नियोजनावर भर!
1

Mahabaleshwar News : पंचायत समितीच्या मासिक सभेत विकासकामा सह पाणीटंचाई व नियोजनावर भर!

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले
2

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.