महमार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. गणेशोत्सवाचा सण तोंडावर आला असताना देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांचा सामना करूनच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. याची प्रचिती यावर्षीही दिसत असून वडखळ नाक्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. वडखळ नाका म्हणजे कायमच मोठ मोठ्या गाड्यांची वाहतूक सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याला मोठ्य़ा प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरु आहे. प्रशासनाला प्रवाशांना होणारा त्रास दिसतच नाही की दिसूनही डोळे झाक केली जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वडखळ नाक्यावरी या खड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. . एसटी बस किंवा इतर वाहनातून प्रवास करताना होडीत बसल्याचा अनुभव येत आहे. या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.वडखळ ते कांदलेपाडा या दीड किलोमीटरच्या अंतरापर्यंत सहा-सात वर्षांपूर्वी टाकलेले पेव्हर ब्लॉक खराब अवस्थेत झाले असल्याने चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बोरीफाटा से वडखळ एसटी बसस्थानकापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता बनविण्यात आला होता. मात्र सदरच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. पडलेल्या या खड्ड्याकडे संबंधीत खात्याने दुत्लक्ष केले असून खड्डे बुजविण्याचा मुहुर्त शोधतात की काय? असा प्रश्न स्थानिक नागरीकांना व प्रवाशांना पडला आहे.
या खड्ड्यातून प्रवास करताना दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. खड्डे चुकवीत प्रवास करताना ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ अशी अवस्था झाली आहे.या खड्ड्यातुन प्रवास करताना वाहन चालकांना वाहने कुर्म गतीने चालवावी लागत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्मानि झाली आहे.सदरचे पडलेले खडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर बुजविण्याची मागणी स्थानिक नागरीक व प्रवासींवर्गाकडून केली जात आहे.