Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: भरत गोगवाले यांच्या हस्ते शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण; म्हणाले भविष्यातील पिढ्यांसाठी…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पाषाणे गावी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2025 | 03:10 PM
भरत गोगवाले यांच्या हस्ते शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण; म्हणाले भविष्यातील पिढ्यांसाठी...

भरत गोगवाले यांच्या हस्ते शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण; म्हणाले भविष्यातील पिढ्यांसाठी...

Follow Us
Follow Us:

कर्जत/संतोष पेरणे:  शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात शिवप्रेमींचा उत्साह पाहण्यास मिळाला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने भरत गोगावले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. गावकऱ्यांशी संवाद साधताना भरत गोगावले म्हणाले की, पाषाणे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा राहिला आहे.ही आमच्या सारख्या छत्रपतींचे विचार सोबत घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिक यांच्यासाठी प्रेरणा देणारी बाब आहे असे गौरोद्गार राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी काढले.

कर्जत तालुक्यातील पाषाणे गावातील कार्यकर्ते तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उभारणी करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पाषाणे गावी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते झाले.त्यावेळी कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना पक्षाचे सह सचिव एकनाथ शेलार,कर्जत मतदारसंघाचे संघटक शिवराम बदे,तसेच तालुका खजिनदार उत्तम शेळके,उप तालुका प्रमुख भरत डोंगरे,प्रशांत झांजे, भरत हाबळे,रामचंद्र बदे,भानुदास राणे आदींसह आयोजक राहुल विशे आदी उपस्थित होते.

नामदार भरत गोगावले यांनी पाषाणे गावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारून शिवप्रेमाचा आदर्श निर्माण केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी अपूर्व कार्य केले आहे.त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण पुढे न्यावा असे आवाहन केले.तर आमदार महेंद्र थोरवे यांनी पाषाणे गावातील भवानी माता मंदिर, छत्रपती शिव शंभू मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही आपल्या ऐतिहासिक वारसा याची साक्ष देणारी ठरणार असे कुटिल केले.भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील आणि याची इतिहासात नोंद घेतली जाईल. शिवचरित्र वाचल्याशिवाय यशाचा मार्ग सापडणार नाही. आजच्या तरुणांनी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर चालत समाजासाठी योगदान दिले पाहिजे असे आवाहन केले.

दरम्यान या बरोबरच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार भाऊसाहेब राऊत यांच्या १२१व्या जयंती सोहळ्याचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते.या सोहळ्यात इतिहासाचे अभ्यासक वसंत कोळंबे यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

महापुरुष जयंती समिती कर्जत,हुतात्मा हिराजी पाटील मंडळ चांदई आणि पिपल्य पब्लिकेशन यांच्या माध्यमातून आणि लेखक वसंत कोळंबे यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब राऊत चरित्र ग्रंथ यांचे प्रकाशन सोहळा कर्जत येथील महिला मंडळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी भाऊसाहेब राऊत यांचे नाती डॉ मिलिंद राऊत,वक्ते पद्मश्री आण्णासाहेब जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस, भाऊसाहेब राऊत यांचे नातू राहुल तिटकारे,माथेरानच्या माजी उप नगराध्यक्ष डॉ शर्मिला राऊत,लेखक घनश्याम डांगरे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड,विद्यालय कशेले येथील मुख्याध्यापक एस एस प्रधान,डिकसळ येथील विद्यालयाचे मुख्याध्यापकललिता राणे, आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत महापुरुष जयंती उत्सव समिती कडून अध्यक्ष भगवान धुळे, दीपक भालेराव, सुनील कोळंबे,दिलीप लोभी, शिवाजी कोळंबे,देविदास कोळंबे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला प्रास्ताविक हावरे यांनी तर सूत्रसंचालन विजय कोंडिलकर यांनी केले.

Web Title: Bharat gowale unveiled the statue of shivaji maharaj in karjat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Karjat
  • Raigad News

संबंधित बातम्या

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
1

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Raigad News: सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड! भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा
2

Raigad News: सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड! भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.