Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : डॅमने घेतला तरुणाचा जीव! पोहायला उतरलेला आर्यन परतलाच नाही; कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना

पळसदरी डॅममध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या १८ वर्षीय आर्यनचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, डॅम परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2026 | 01:14 PM
डॅमने घेतला तरुणाचा जीव! पोहोयला उतरलेला आर्यन परतलाच नाही; कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना

डॅमने घेतला तरुणाचा जीव! पोहोयला उतरलेला आर्यन परतलाच नाही; कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Follow Us
Follow Us:
  • डॅमने घेतला तरुणाचा जीव
  • पोहोयला उतरलेला आर्यन परतलाच नाही
  • कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना
कर्जत तालुक्यातील पळसदरी डॅम परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन थापर (रा. घणसोली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन थापर हा भारतीय विद्यापीठात बीबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टनिमित्त तो सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत पळसदरी येथे आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसह डॅम परिसरात गेला. आर्यनला पोहता येत असल्याने तो पाण्यात उतरला. दोन वेळा पोहत जाऊन तो सुरक्षित परतही आला. मात्र, तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात गडप झाला. मित्रांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले.

पुण्यात तापमानाचा पारा पुन्हा चढला; सकाळी दहानंतरच बसतोय उन्हाचा चटका

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली असता रेस्क्यू टीमला यश आले आणि आर्यनचा मृतदेह डॅममधून बाहेर काढण्यात आला.

अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली व परिस्थितीची माहिती नसताना पोहण्यासाठी उतरणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, पोलीस पाटील विनया खोपकर, डेला एडवेंचर चे गणेश गीध आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आज सकाळी सापडला मृतदेह

कर्जत पोलिसांनी खोपोली येथील हेल्प फॉउंडेशनच्या माध्यमातून बचाव आणि शोधकार्य राबवले. मात्र काल संध्याकाळी उशीरापर्यंत आर्यनचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर आज त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव टीम ना यश आले आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत असून उन्हाळी पर्यटनासाठी धरण आणि नद्यांवर जात असताना सावधगीरी बाळगण्याचे अवाहन या निमित्ताने रायगड प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पळसदरी धरण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात, कर्जत-खोपोली राज्य महामार्ग आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून, विशेषतः पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईमुळे पर्यटकांचे आकर्षण असते. या धरणाची निर्मिती १९१२ मध्ये रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आली होती. त्याकाळी वाफेच्या इंजिनाला पाणी पुरवण्यासाठी याचा वापर केला जात असे. तसेच मुंबई, पनवेल आणि नवी मुंबईतील नागरिक पावसाळी सुट्टीसाठी (Monsoon Picnic) येथे मोठ्या संख्येने येतात. पळसदरी डॅम परिसरात अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत, विशेषतः पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या बातम्या येत असतात. धरणात पाणी खोल असून गाळ असल्याने पोहण्यासाठी उतरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

Rohit Pawar News: ‘सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर येतात, मग नेत्यांचे कुठे जातात?’ रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना खोचक सवाल

Web Title: Gansoli navi mumbai student aryan thapar drowns palsadari dam karjat raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Karjat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.