
टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल? वन अधिकारी कुठे आहेत; कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल
गुजरात राज्यातील टोरंट पॉवर या कंपनीला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी येथे सायडोंगर भागात हायड्रॉलिक प्रकल्प उभारत आहे. या प्रस्तावित धरण प्रकल्पाला धरण परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी विरोध केला आहे.तेथे ६४० हेक्टर जमीन वन विभागाची असून २३० हेक्टर जमीन खासगी जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.वन जमिनीवर असलेली लाखो झाडे आहेत आणि ही झाडे स्थानिकांनी श्रमदान करून लावली आणि वाढवली आहेत.
आता तीच सर्व झाडे तोडण्यास सुरुवात झाली असून या धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेली झाडे नष्ट होऊ लागली आहे. बुडीत क्षेत्रातील काही जमीन क्षेत्र हे खासगी असून त्या जमिनीवरील झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे.या १५००० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तीन नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे प्रकल्पाच्या परिसराची हवाई सफर देशाचे पंतप्रधान करू शकतात आणि त्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील झाडांची तोड टोरंट कंपनी प्रशासनाने हाती घेतली आहे.
टोरंट कडून सायडोंगर परिसरातील आदिवासी वाडी पासून पुढील जंगलात इलेक्ट्रिक कटर यांच्या सहाय्याने झाडे तोडली जात आहे.त्यावेळी तोडण्यात येत असलेली झाडे तेथून उचलण्यास देखील कामगार लावण्यात आले आहेत. शंभर वर्षे आणि त्याहून जुनी झाडे तोडली जात असून त्या ठिकाणचा संपूर्ण परिसरात कोणत्याही झाडाच्या अडथळा विना दाखवता यावा यासाठी सर्व झाडे तोडली जात आहेत.मात्र येथील ६४० हेक्टर जमिनीवरील झाडे लावण्याचे नियोजन कोणतेही नाही तसेच वन विभागाने जमीन प्रकल्पाला दिल्याचे कोणतेही पत्र वन विभाग स्थानिकांना देत नाही.
तसेच असे कोणतेही पत्र आतापर्यंत सोशल मीडियावर देखील दिसून आलेले नाही आणि असे असताना झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कर्जत पर्यावरण बचाव समिती आक्रमक झाली आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन दिलेली नाही आणि असे असताना देखील झाडे तोडली जात असतील तर आपल्या कोणत्या जगात आहोत असा प्रश्न कर्जत तालुक्यातील पर्यावरण प्रेमी उपस्थित करीत आहेत.मात्र बुडीत क्षेत्रातील झाडे तोडली जात असल्याने प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे.
Ans: टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रातील परिसरात झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप कर्जत पर्यावरण बचाव समितीने उपस्थित केला आहे.
Ans: परिसरात झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप असताना वन अधिकारी कुठे आहेत आणि वृक्षतोड रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.
Ans: वृक्षतोडीच्या आरोपांची चौकशी, संबंधित परवानग्यांची तपासणी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई होण्याची मागणी केली जाऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतरच स्पष्टता येईल.