
उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम
कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाडामध्ये टाटा कंपनीच्या कारभारामुळे अशी घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टाटा कंपनीकडून जलविद्युत प्रकल्पासाठी 65 एकर जमिनीमध्ये खोदकाम करून पाणी साठवण धरण बांधले जात आहे. दरम्यान या पाणी साठवण धरणासाठी केले जात असलेले खोदकाम केलेली माती यांचे डोंगर उभे राहिले आहेत. ते डोंगर उद्या तापकीरवाडी धनगरवाडा या 22 घरांवर कोसळून येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत भिवपुरी गावच्या टाटा कंपनी आपल्या मालकीच्या जमिनीवर धरण बांधत आहे. कंपनीच्या मालकीच्या जमिनीमध्ये 100 मीटर खोदकाम करून पाणी साठवण करणारे मोठा तलाव निर्मिती केली जात आहे. टाटा कंपनी कडून येथे विद्युत स्टोअरेज करण्यासाठी उदांचन १००० मेगाव्हॅट प्रोजेक्ट च्या काम वर्षभरापासून सुरू आहे. काम सुरू झाल्यापासून माती आणि दगड फोडून खोदकाम सुरू असून प्रचंड प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात आहेत.
65 एकर जमिनीमध्ये खोल खड्डा खोदला जात असून ही खोदकाम गेल्या वर्षापासून सुरू असून टाटा कंपनीकडून सुरू असलेले उत्खनन यामुळे परिसरात पर्यावरण धोक्यात आले आहे. खोदकाम करण्यासाठी अवजड मशिन आणण्यात आल्या असून दिवसरात्र हे काम सुरू आहे.त्यावेळी खोदकाम करण्यासाठी प्रसंगी सुरुंग स्फोट केले जात असतात आणि त्यावेळी निघणारी माती ही एका बाजूला साठवून ठेवली जात आहे.त्यात दगड एका बाजूला आणि दुसरी बाजूला मातीचे ढीग अशी रचना असून ते इमारती एवढ्या उंचीचे मातीचे ढीग हे तेथील आदिवासी लोकांसाठी जीव घेणारे ठरू शकतात.
गतवर्षी मे महिन्यापासून जमिनीमध्ये उत्खनन सुरू असून मातीचे ढीग बाहेर निघत आहेत. हे मातीमुळे डोंगर तयार झाले असून त्यातून मोठ मोठे डोंगर तयार झाले आहेत.हे मातीचे डोंगर स्थानिकांसाठी धोकादायक बनले आहेत.टाटाचे उदांचन १००० मेगा व्हॅट क्षमतेचा प्रोजेक्ट तयार केला जात आहे. या प्रोजेक्ट साठी खूप मोठ्या प्रमाणात उत्खन केले जात आहे. विद्युत निर्मितीसाठी वापरला जाणारे पाणी स्टोरेज करून पुन्हा उपयोगात आणण्यासाठी उत्खनन केले जात आहे हे स्थानिकांचा जीव घेणारे ठरू शकतात.
प्रशासनाने याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाहीत आणि त्यामुळे तापकीर वाडी येथील धनगरवाडा हे येथील आदिवासी ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. टाटा कंपनी कडून धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या तापकीर वाडी आणि धनगर वाडा यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या उपोषणाच्या वेळी दिले होते.त्या लेखी आश्वासनाला अकरा महिने झाले असून कंपनीने कोणत्याही प्रकाराची कार्यवाही केलेली नाही.
त्यामुळे संपूर्ण पावसाळा येथील आदिवासी जीव मुठीत घेऊन जगले आहेत.तर घरावर येणारे दगड यामुळे रात्रीच्या वेळी लहान मुलांना कुशीत घेऊन रात्र जगण्याची वेळी आदिवासी कुटुंबांवर आली आहे.त्यात दगड घरावर येत असल्याने दुखापत होण्याची भीती आणि दुसरीकडे आमच्या घरच्या भिंतींना तडे गेल्याने आदिवासी लोकांच्या घरे कोसळण्याची वाट टाटा कंपनी पाहत आहेत काय?असा सवाल सीता गंगाराम शिद यांनी उपस्थित केला आहे.
आमचे मरण याच पडक्या घरामध्ये आहे असे आम्हाला दिसू लागले आहे. आम्हाला जमीन देत नाही,घरे बांधून देत नाही की साधे प्यायचे पाणी टाटा कंपनी देत नाही. त्यांना आमचे जीवन संपवायचे आहे असे आम्हाला वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया सीता गंगाराम शिंदे यांनी दिली.