Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

रोहा शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेल्मेटला विरोध नसल्याचे सांगत, शहरातील दैनंदिन प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेदरकार वाहनचालक आणि ट्रिपल सीट प्रवासावर अधिक भर द्यावा, अशी मागणी होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2026 | 12:12 PM
Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; 'सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा', स्थानिकांची मागणी

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; 'सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा', स्थानिकांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • रोह्यातील काही नागरिकांनी शहरातील हेल्मेट सक्तीवर आक्षेप घेतला आहे.
  • ट्रिपल सीट, भरधाव वाहनचालक आणि ‘धूम स्टाईल’ रायडिंगवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
  • शहरांतर्गत लहान अंतराच्या प्रवासासाठी नियमांची अंमलबजावणी करताना वास्तव परिस्थितीचा विचार करावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रोहा: रोहा शहरात पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली असून बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड परिसरात दंड आकारले जात आहे. गावामध्ये ही सक्ती केली जात असताना शहराबाहेर शेकडो दुचाकी विनाहेल्मेट प्रवास करताना दिसून आहेत, तिथे कोणतीही कारवाई होतं नसून नागरि वसतीमधील दुचाकिंना सॉफ्ट टार्गेट केले जात असल्याने रोहेकर संतापले आहेत. पोलिसांप्रती नाराजी व्यक्त करताना धूम स्टाईल, ट्रिपलसीट दुचाकिंवर आधी कारवाई करा, शहरातील अवैधधंदे सर्वप्रथम बंद करा, अशी मागणी रोह्यात जोर धरत आहे.

होय, खरे गद्दार उद्धव ठाकरेच; शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा गंभीर आरोप

हेल्मेट नक्की सुरक्षित साधन आहे, यात वाद नाही. परंतू आता रोहा शहरात हेल्मेट न घातल्यास दंड वसुलीला सुरुवात झाल्याने शहरामध्ये हि कारवाई उचित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांच्या तुलनेत रोहा हे एक छोटे शहर आहे. त्यामुळे येथील लोकांना अनेकदा शहराच्या आतच प्रवास करावा लागतो आणि अशा प्रवासासाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे नागरि वसतीमध्ये अशी कारवाई करू नयेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

रोहा पोलिसांनी वाहन चालविताना शिस्त, धूम स्टाईल रोखली तर वाहतूक, रहदारी अधिक सुरक्षित होईल, रोह्यातून बाहेर जाणाऱ्यांना हेल्मेट घालणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे, पण शहरातील स्थिर वस्तीत हेल्मेट सक्तीला नागरिकांनी विरोध केला असून तीव्र नाराजी व्यक्त होतं आहे.

अनेक लोक विशेषतः शाळा आणि महाविद्यालयात जाणारे तरुण एकाच दुचाकीवर तिघे जण बसून अतिशय वेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवतात. अनेकदा नवीन गाड्या त्यावर ट्रीपल सीट सुसाट जाणाऱ्या गाड्यांमुळे मुख्यतः आदिवासी मुलांचे अपघात झाल्याचे समोर आले आहे. काहींनी अशा अपघातात जीव गमावला लागला आहे. पोलिसांनी अशांवर कारवाईचा बडगा दाखविणे गरजेचे असताना सामान्य नागरिकांना नागरि वस्तीत टार्गेट केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरात अगदी किरकोळ अंतरासाठी दुचाकीचा वापर अपरिहार्य झाला आहे. दूध, भाजीपाला आणणे, दैनंदिन कामांसाठी नागरिक दुचाकी वापरतात, त्यामुळे सर्वांवर सरसकट हेल्मेट सक्ती, दंडाची अमलबजावणी करताना व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. दंडाच्या तरतुदींमध्ये वास्तव परिस्थितीचा विचार करून आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. – संदीप सरफळे, सरचिटणीस, रोहा.

शहराबाहेर जाणा-यांना हेल्मेट सक्ती करणे ठिक आहे, पण शहरात वाहतुकीचे नियम पाळले जावेत, धूम स्टाईल बाईकिंग रोखली जावी, वाहनांना शिस्त लावली जाणे गरजेचे आहे. सकाळी धाटावमध्ये शंभरहून अधिक जण रोह्याहून हेल्मेट शिवाय येत असलेले पाहतो, तेव्हा शहरात हेल्मेट सक्ती चुकीची वाटते. – राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

हेल्मेट सक्तीला कोणाचाही विरोध नाही, मात्र रोहासारख्या छोट्या शहरात केवळ दंडावर भर देण्यासाठी ही कारवाई नसावी. वाहतूक शिस्त, ट्रिपल सीट आणि बेदरकार वेगावर कारवाई होणे अधिक गरजेचे आहे. – एडवोकेट दीपक भगत, रोहा

रोह्यात कोणताही कायदा, नियम, करवाढ, दरवाढ ही लोकांचे मत अथवा जनसुनावणी न घेता अचानकपणे लागू करण्याचा अघोषित पायंडा पडत चालला आहे. – महेंद्र मोरे, ज्येष्ठ पत्रकार

अवैध धंदे बंद व्हावेत, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, नागरिकांमध्ये जागृती अभियान राबविल्यास अनेक अवैध धंद्यांवर कारवाईस मदत होईल. अवैध धंद्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आहे. – महेश बामगुडे, अध्यक्ष दसबा फाऊंडेशन

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Helmet rule sparks public anger in roha citizens demand action against triple riding and reckless bikers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
1

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम
2

पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
3

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
4

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.