
मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे या मेन लाईन वरील भिवपुरी रोड ते कर्जत या मार्गावर मध्य रेल्वेकडून कारशेड उभारले जात आहेत. कारशेडसाठी सध्याच्या रेल्वे मार्गाच्या बाजूला 100 ते 150 मीटर एवढी जमीन रेल्वे कडून घेतली जात आहे. सध्या ज्या जमिनीवर कारशेड उभे राहणार आहे त्या जमिनीवर किरवली, उमरोली, चिंचवली या 3 ग्रामपंचायत मधील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. जमिनीवर 100 टक्के प्रमाणात भाताची शेती हि पावसाळ्यात केली जात असते,तर हिवाळ्यात या भागातील जमिनीवर कडधान्य शेती केली जाते. त्यामुळे पूर्णपणे शेतीसाठी वापरात असलेल्या जमिनीवर कारशेड उभारले जात असून त्या जमिनीवर नांगर फिरवण्यास रेल्वे कडून सुरु झाला आहे. ही जमीन मिळावी यासाठी रेल्वेकडून शेतकऱ्यांना आर्थिक आमिषे दाखवून खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती किरकोळ रक्कम पडणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी केली आहे.
मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी याबाबत शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या प्रकल्प उभारण्यासाठी घेतली जात असल्याने सर्व शेतकरी हे प्रकल्पग्रस्त बनतात.त्यामुळे कारशेड साठी जमिनी घेणाऱ्या रेल्वेकडून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना रेल्वेमध्ये एका खातेदाराला नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची भेट घेणार आहोत. येत्या 8 दिवसात मनसेकडून प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या नोकरी देण्याच्या प्रश्नी सकारातमक निर्णय घेतला नाही तर काही दिवसात मनसे कडून आंदोलन उभे केले जाईल आणि त्यावेळी कारशेड चे सुरु असलेले काम शेतकरी आणि मनसेचे कार्यकर्ते कामे बंद पाडतील असा इशारा जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.
Ans: मध्य रेल्वे भिवपुरी रोड ते कर्जत या मेन लाईन मार्गावर नवीन कारशेड उभारत आहे. या कारशेडमुळे गाड्यांची देखभाल, तांत्रिक कामे आणि रेल्वेच्या ऑपरेशनला मदत मिळणार आहे.
Ans: एकूण सुमारे नऊ किलोमीटर परिसरात कारशेड उभारले जाणार असून, सध्या रेल्वेकडून सुमारे 3 एकर जमीन खरेदी केल्याचे सांगितले आहे.
Ans: किरवली, उमरोली आणि चिंचवली या तीन ग्रामपंचायतींच्या शेतकऱ्यांची जमीन या कारशेड प्रकल्पात येते.