Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शेतीचे पंचनामे न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

परतीच्या पावसाने फक्त मराठावाडाच नाही तर कोकणभागातील शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे.  यंदाच्य़ा मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील कुंभे येथील भाताची शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 13, 2025 | 05:25 PM
Karjat News : शेतीचे पंचनामे न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत /संतोष पेरणे : परतीच्या पावसाने फक्त मराठावाडाच नाही तर कोकणभागातील शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे.  यंदाच्य़ा मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील कुंभे येथील भाताची शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र त्या भागातील शेती नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना असलेले तेथील ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी तेथे पोहचले नाहीत. शेतकऱ्यांची हि कैफियत किसान क्रांती संघटनेने कर्जत तालुका तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.दरम्यान य्त्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे का केले गेले नाहीत, अशी विचारणा कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना केली आहे.

Matheran News : घाटरस्ते सुधारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु ; पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु

कर्जत तालुका आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो.  तालुक्यातील अतिवृष्टीृमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी पंचनामी करण्याचे आदेश शासनाच्या वतीने कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी दिले आहेत. त्यासाठी तालुक्यातील सर्व 210 महसुली गावातील पंचनाम्यांचा तपशील जाहीर केला आहे.तालुक्यातील प्रत्येक गाव आणि आदिवासी वाडी मध्ये एकतर कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक यांची तर काही ठिकाणी महसूल ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मात्र शासनाच्या या आदेशाचे पालन होताना दिसून येत नाहीत अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. नेरळमधील कुंभे गावातील सदानंद शिवराम भोईर शेतकरी यांचे नुकसान झाले असल्याने तलाठी सजा नेरळ येथे जाऊन आपल्या नुकसानीचे सांगितले असता, नाव नंबर लिहून घेतले. त्यानंतर तलाठी यांनी आम्ही येऊन पंचनामे करू असे निरोप दिले. अनेक दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहिली परंतु तलाठी मात्र पंचनामेसाठी आले नाही. यासाठी शेतकरी तलाठी सजा नेरळ येथे जाऊन विचारणा केली असता. तलाठी यांनी उलट उत्तर देत अरे राव्याची भाषा वापरण्यात आली. तसेच आता पंचनामे करून झाले असून सर्व कागदपत्रे आम्ही तहसीलदार यांना सादर केली आहेत. असे सांगण्यात आले.

Karjat News : धाकधूक वाढली! कर्जत पंचायत समितीचे आरक्षण सोडत, महिलांनाही 50 टक्के जागांवर संधी

अशाप्रकारे कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या अशा समस्या असू शकतात. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांची कागदपत्रे ही सादर केली नसती अशा शेतकऱ्यांना तहसीलदार धनंजय जाधव यांनी तलाठी यांना सूचना देऊन राहिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून सादर करण्याचे आदेश द्यावे. आणि तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी यामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.या प्रकरणी किसान क्रांती संघटनेने त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची दखल समाज माध्यमांनी घेतली. त्यांनतर चक्रे फिरली असून कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

Web Title: Karjat news action should be taken against gram panchayat officials who do not conduct agricultural panchnama demand of affected farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • karjat news

संबंधित बातम्या

Karjat News : धाकधूक वाढली! कर्जत पंचायत समितीचे आरक्षण सोडत, महिलांनाही 50 टक्के जागांवर संधी
1

Karjat News : धाकधूक वाढली! कर्जत पंचायत समितीचे आरक्षण सोडत, महिलांनाही 50 टक्के जागांवर संधी

Matheran News : घाटरस्ते सुधारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु ; पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु
2

Matheran News : घाटरस्ते सुधारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु ; पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात
3

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
4

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.