Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

एम एम आर डी ए कडून आपल्या मर्जीतील ठेकेदाराला करोडोंचे कामे दिली असल्याने ठेकेदाराला मालामाल करण्यासाठी अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 05, 2026 | 02:03 PM
Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष,
  • ठेकेदारांची मुजोरी,
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील नेरळ गुडवण रस्त्याच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत. या कामांची पाहणी करायला एम एम आर डी ए चे अभियंते येत नाहीत आणि त्यामुळे ठेकेदाराकडून मर्जीनुसार कामे सुरू आहेत.एम एम आर डी ए कडून आपल्या मर्जीतील ठेकेदाराला करोडोंचे कामे दिली असल्याने ठेकेदाराला मालामाल करण्यासाठी अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग पासून सुगवे फाटा येथून गुडवण नेरळ या राज्यमार्ग दर्जाच्या रस्त्याने रुंदीकरण काम सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. या रस्त्यावर रुंदीकरण तसेच नवीन साकव पूल अशी कामे सुरू आहेत.ही सर्व काँक्रीटीकरणाची कामे असल्याने ती कामे होत असताना पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक बाब असते. मात्र पाण्याचा वापरच केला जात नसल्याने काँक्रीटीकरण किती टिकावू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

नेरळ गुढवण सुगवे राज्यमार्ग रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत.या रस्त्यामध्ये असलेले साकव पूल नव्याने बांधले जात असून संरक्षक भिंती देखील बांधल्या जात आहेत. या रस्त्यावरील सुरू असलेल्या साकव पुलाच्या ठिकाणी काँक्रीटीकरण झाल्यानंतर पाणी मारण्यात येत नाही. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र त्यातील नेरळ पिंपळोली,आंत्रड,गुढवण,सुगवे या मार्गावडील आंत्रड ते पिंपळोली या दरम्यान असलेल्या पुलाचे काम सुरू आहे. पुलाची निर्मिती हा रस्त्याचा महत्त्वाचा भाग असतो आणि त्या त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे काम केल्यानंतर पाण्याचा वापर केल्यास ते बांधकाम मजबूत होत असते. कोणत्याही ठिकाणी सिमेंटचे बांधकाम झाल्यावर पाण्याचा वापर होत नाही आणि त्यामुळे रस्त्यावर सुरू असलेली काँक्रिटची कामे नित्कृष्ट होत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी या कामाबद्दल आवाज उठविला असता रस्त्याचे करोडींचे कामे सुरू असताना कुठेही अधिकारी वर्ग येऊन पाहणी करीत नाही. त्यामुळे रस्त्यावरील कामांचा दर्जा सुमार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा

एम एम आर डी ए चे निधीमधून नेरळ गुडवण सुगवे राज्यमार्ग रस्त्यावरील कामे केली जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा कोणताही अधिकारी कामाची पाहणी करायला फिरकत नाही. त्यामुळे ठेकेदार कंपनी मनमानी करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अधिकारी वर्गाचे नंबर शोधून स्थानिक त्यांना या कामाबद्दल विचारणा करीत आहेत,पण त्यांचे फोन आल्यानंतर स्थानिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे औदार्य देखील प्राधिकरणाचे अधिकारी दाखवत नाहीत. त्यामुळे नित्कृष्टपणे काम करणाऱ्या ठेकेदारांचे कामाची चौकशी व्हावी अशी मागणी या भागातील स्थानिक करू लागले आहेत. बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला याविषयी जाब विचारणार का? आणि पाणी का मारत नाही याविषयी चौकशी होणार का? की ठेकेदाराला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पाठीशी घालणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहेत तसेच त्या चौकशीवर या रस्त्याचे भवितव्य देखील अवलंबून आहे.

आदिवासी वाडीची तहान भागली! स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर कोरळवाडीत पाणी; आमरण उपोषण अखेर यशस्वी

Web Title: Contractors negligence administrations deliberate neglect of road work allegations by angry citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु
1

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक
2

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग
3

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी
4

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.