Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : नाद करा पण आमचा कुठं; पालिकेच्या शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत बोलबाला

पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानच्या शिरपेचात तुरा रोवणारी बातमी समोर आली आहे.यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरावर भरारी मारली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2026 | 03:24 PM
Matheran News : नाद करा पण आमचा कुठं; पालिकेच्या शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत बोलबाला
Follow Us
Close
Follow Us:

 

  • पालिकेच्या शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत बोलबाला
  • राज्यस्तरीय समितीचे मूल्यांकन
  • माथेरानच्या शिरपेचात तुरा रोवणारी बातमी
माथेरान/ संंतोष पेरणे : पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानच्या शिरपेचात तुरा रोवणारी बातमी समोर आली आहे. गिरीस्थान नगरपरिषद शिक्षण मंडळाची हुतात्मा वीर भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेने यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरावर भरारी मारली आहे.जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम आलेल्या माथेरान पालिका शाळेचे राज्यस्तरीय समितीने मूल्यांकन केले असून राज्य स्तरावर माथेरान पालिका नंबर पटकावेल असा आशावाद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांना आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता जानेवारी २०२५ ते१५ फेब्रुवारी २०२६ अभियानास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.सन २०२५-२६ मधील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह हे अभियान राबविले गेले.या अभियानात सन २०२४-२५ या वर्षी रायगड जिल्हा प्रथम पारितोषिक मिळवले होते. या वर्षी तिसऱ्या टप्प्यात माथेरान शहरातील वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेने सक्रीय सहभाग घेत उंच भरारी घेतली आहे.

Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे शिक्षण मंडळाची शाळा असलेल्या या शाळेने यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणच्या शाळेने राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मधील राज्यस्तरावरील मूल्यांकन करण्यात आले.राज्यस्तरीय मुल्याकंन समितीने माथेरान मध्ये येऊन शाळेने अभियान काळात केलेल्या उपक्रम आणि पायाभूत सुविधा यांची पाहणी केली.

मूल्यांकन समितीचे शिक्षण संचालक डॉ महेश पालकर,शिक्षण उप संचालक सुचेता पाटेकर,नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी भानुदास रोकडे,परभणी येथील जिल्हा शिक्षण अधिष्ठाता डॉ प्रल्हाद खुणे यांचे स्वागत आणि अभियानामध्ये शाळेने केलेल्या कार्याची माहिती माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे आणि तालुका गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी दिली.

Raigad News: रायगडच्या शेतकऱ्यास ‘वालीच’ नाही! नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हतबल

माथेरान येथील हुतात्मा वीर भाई कोतवाल प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची वाचनाची आवड वाढावी यासाठी ग्रंथालय तसेच वाचन कट्टा वाचन कोपरे आणि पुस्तक पेढी तयार आहे.प्राथमिक विद्या मंदिर मध्ये विज्ञान प्रयोगशाळा असून कार्यालयासाठी स्वतंत्र्य कार्यालय आणि पुरेशे वर्ग देखील उपलब्ध आहेत.शाळेच्या भिंती रंगीबेरंगी फुलांनी रंगवल्या असून शाळेच्या भिंतीवर प्राणी पक्षी फुले आदी सर्व काही असल्याने शाळेच्या आवारात आलेला पर्यटक देखील काही वेळ तेथे खिळून राहतो.येथे खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असून खेळताना एखादा विद्यार्थी जखमी झाला तर त्यासाठी प्रथमोपचार पेटी शाळेत उपलब्ध आहे.

शाळेत पिण्याच्या पाण्यातून साथीचे रोगाना निमंत्रण दिले जाऊ नये यासाठी जलशुद्धीकरण संच सह पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे. मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कक्ष असून तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत.वर्ग खोल्या तेथे पुरेशा असल्याने विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुटसुटीत असलेली शाळा म्हणून माथेरान शाळेने नवीन पायंडा आपल्या विद्यार्थी बैठक व्यवस्थेतून घालून दिला आहे.आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्कालीन कक्ष उपलब्ध असून शालेय सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलेली ही शाळा असून चाईल्ड हेल्प लाइन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण हेल्प लाइन यांची माहिती देण्यात येत असते.

सरकारी विजेवर अवलंबून न राहता येथे सोलर चे माध्यमातून शाळेला वीज पुरवठा होतो.शाळेत महावाचंन चळवळ आयोजित केली जाते आणि त्यातून वाचनाची आवड जोपासण्याचा प्रयत्न केला जातो.या शाळेने हरित महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र अभियानात सहभाग घेत अनेक वृक्षांची लागवड केली असून एक पेड माँ के नाम मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग घेतला आहे.शाळेचा परिसर विद्यार्थी शिक्षण आणि क्रीडा केंद्रित असावा यासाठी प्रयत्न केला आहे.

पालिकेची शाळा असूनही असलेल्या सोयी सुविधा

पर्यावरण स्नेही इको क्लब
कचरा व्यवस्थापन
पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था
स्वतःचे मैदान आणि खेळाचे साहित्य
इंटरनेट आणि वायफाय सुविधा
डिजिटल प्रयोगशाळा..
शाळेत सेंद्रिय खतावर आधारित परसबाग
विद्यार्थ्यांची १०० टक्के आधार वैधता
संच मान्यता पोर्टल कार्यान्वित
ग्रंथालयात पाच पट पुस्तक आणि त्यात जगातील भाषेतील पुस्तके उपलब्ध
तंबाखूमुक्त शाळा
एन सी सी,आर एस पी,स्काऊट गाईड, कब बुलबुल उपक्रम
अमली पदार्थ विरोधी गट
सखी सावित्री समिती
शाळा परिसर सीसीटीव्ही कॅमेरा यांचे कक्षेत
अभ्यागत आगमन आणि निर्गमन नोंद वही
कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी
विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक ई रिक्षा मधून सुरक्षित वाहतूक
गुणवत्ता वाढीसाठी विद्यांजली पोर्टल वर नोंदणी
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आकर्षक रॅम्प
दरवर्षी शाळेचे वार्षिक नियोजन
करिअर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन
क्षेत्र भेटी आणि ऐतिहासिक वास्तू तसेच ऐतिहासिक वस्तूंचे जतन
भाषण आणि वाचन क्षमता
शाळकरी मुलांसाठी या सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Matheran news municipal school dominates state level competition karjat cm my school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • karjat news
  • matheran news

संबंधित बातम्या

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?
1

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय
2

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक
3

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप
4

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.