Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

कर्जत तालुक्यात टाटा कंपनीचा जलविद्युत प्रकल्प असून हाच प्रकल्प आता नव्याने विस्तारला जात आहे.100 वर्षे जुन्या असलेल्या या प्रकल्पामधून अधिक क्षमतेने वीज निर्मिती व्हावी.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 30, 2025 | 04:29 PM
Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे :  तालुक्यात टाटा कंपनीचा जलविद्युत प्रकल्प असून हाच प्रकल्प आता नव्याने विस्तारला जात आहे.100 वर्षे जुन्या असलेल्या या प्रकल्पामधून अधिक क्षमतेने वीज निर्मिती व्हावी, यासाठी टाटा कंपनी कडून नवीन प्रकल्प उभारला जात असून तब्बल एक हजार मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.दरम्यान, स्थानिकांना ऍक्शन प्लॅननुसार कोणत्याही सुविधा न देणाऱ्या टाटा जलविद्युत प्रकल्पाला ग्रामसभा घेऊन विरोध दर्शवला आहे. याबाबत 6 ऑक्टोबर पासून उपोषणाला बसण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे.

सर जे आर डी टाटा यांनी 1907 मध्ये पुणे जिल्ह्यात आंध्रा धरण बांधले आणि या धरणातील पाणी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे वळवून त्या पाण्यावर वीज निर्मिती केली. भिवपुरी येथे जलविद्युत केंद्र बांधून या ठिकाणी निर्माण होणारी वीज मुंबईकडे पाठवणाऱ्या टाटा कंपनीकडे भिवपुरी भागातील शेकडो एकर जमीन आहे. त्याठिकाणी वीज निर्मिती झाल्यानंतर पाणी कर्जत तालुक्यातील दुबार शेतीसाठी आणि नंतर कर्जत तालुक्यातून ठाणे जिल्ह्यात पोहचते.त्यामुळे टाटा जलविद्युत प्रकल्प कर्जत तालुका आणि ठाणे जिल्ह्यासाठी पाण्याची वाहिनी समजली जात आहे.

Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश

याच टाटा कंपनीकडून भिवपुरी येथील 200 एकर जमिनीवर बंधारा बांधून डोंगरातून वाहून जाणारे पाणी अडवले जाणार आहे. त्या पाण्यावर तब्बल एक हजार मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे. एक हजार कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून या प्रकल्पामुळे अपेक्षित असलेल्या सुविधा मिळत नसल्याने स्थानिकांनी आता उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली असून ग्रामस्थांनी शासनाला या ग्रामसभेचा अहवाल पाठवून दिला आहे.

टाटा पॉवर कंपनी कडून मौजे भिवपुरी कॅम्प येथे 1000 मेगावॉट क्षमतेचा उदंचन प्रकल्प उभारला जात आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजूर केला असून त्यामध्ये जनसुनावणी दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत भिवपूरी (कॅम्प) ने सादर केलेल्या अहवालातील सर्व योजनांचा तसेच मागण्यांचा टाटा पॉवर कंपनीने “सदर योजना या आपल्या सामाजिक दायित्व योजनेतून पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले होते.

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत

त्याचवेळी केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने सदरहू योजना विशिष्ट आणि मानक अटी शर्ती घालूनच पर्यावरण मंजुरी दिली होती. मात्र या अटीची पूर्तता न झाल्यास मंजुरी रदद करण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसा ना हरकत दाखला देण्यात आला होता आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यावर पक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालय यांच्याकडून देण्यात आल्या होत्या.जुलै 2025 मधील ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीतील शाळा अंगणवाडी, सोलर लाईट सोलर पैनल, रस्ते, पाणी, आरोग्य या मुलभूत सुविधांचे एकही कार्य त्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या ऍक्शन प्लान नुसार कामे केली असल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला आहे.

ग्रामस्थ करणार उपोषण..

घटना आणि कायद्याच्या नियमांच्या अधीन राहून गृप ग्राम पंचायत टाटा पॉवर कंपनीस संपूर्ण सहकार्य करीत नाहीत.त्याचवेळी कंपनी मनमानी करुन स्थानिक शेतकरी असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी तसेच काम न देता बाहेरील राज्यातील कामगारांना आणून कामे देण्यात प्राधान्य दाखवत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.त्यामुळे येत्या सहा ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांचे उपोषण सुरू होणार आहे अशी माहिती स्थानिक हेमंत नवले,दत्तात्रय नवले, मनोज मोरमारे,मनोज शितोळे,बजरंग घाडगे,संतोष घाडगे,शिवाजी दिसले,तानाजी करडे,स्वप्निल भोसले यांनी दिली आहे.

Web Title: Karjat news after the torrent now the shadow of a new project locals oppose the tata hydroelectric project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News
  • Tata Group

संबंधित बातम्या

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार
1

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार

Raigad News : आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट; नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय
2

Raigad News : आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट; नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार
3

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष
4

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.