Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहिम; नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी

नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी मिळाली असून फेब्रुवारी 2026 पासून नव्या दराने पाणीपट्टी आकारली जाणार आहे. नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या सविस्तर

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 13, 2025 | 02:51 PM
Karjat News : थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहिम; नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी
Follow Us
Close
Follow Us:
  • थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहिम,
  • नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी,
  • नेमकं प्रकरण काय ?
कर्जत/संतोष पेरणे : नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी मिळाली असून फेब्रुवारी 2026 पासून नव्या दराने पाणीपट्टी आकारली जाणार आहे.तर अनेक वर्षे थकीत असलेली घरपट्टी मध्ये सवलत देऊन शासनाचा अध्यादेशानुसार कोणालाही थकीत घरपट्टी मध्ये सवलत देऊ नये, असा ठराव देखील नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. नेरळ ग्रामपंचायतीची मालमत्ता धारकांकडे तब्बल 90 लाखाची घरपट्टी थकीत असून जानेवारी 2026 पर्यंत सर्व थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी संकलन करण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत हाती घेणार आहे.

नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढ करण्याबाबत ठराव घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते. सुरुवातीला थकीत घरपट्टीबद्दल शासनाचा नियम सांगण्यात आला. त्यात थकीत घरपट्टी वसुली साठी 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय ग्रामसभेत ग्रामस्थ घेऊ शकतात किंवा त्या शासन निर्णयाला ग्रामसभा विरोध करू शकतो असा नियम आहे. त्यामुळे सभेत हा विषय उपस्थितीत होताच माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी ठराव घेत कोणालाही घरपट्टी मध्ये सवलत देऊ नये आणि थकीत असलेली सर्व घरपट्टी वसुली करण्यासाठी ठोस नियोजन कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता धारक ग्रामस्थ यांच्या कडून 90 लाखाची थकबाकी आहे. ती सर्व थकबाकी वसूल करावी आणि शासनाच्या निर्णयानुसार सवलत देण्यास ग्रामसभेने विरोध दर्शवणारा ठराव बहुमताने हात उंचावून मंजूर केला असुन त्या ठरावालादिलीप बोरसे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नेरळ ग्रामपंचायत मधील वीज देयके मधील अतिभार बद्दलचा निर्णय गेली सहा महिने पाठपुरावा करून पूर्ण करून घेणारे प्रशासक सुजित धनगर,ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले आणि ग्रामस्थ अंकुश दाभने यांचा अभिनंदन ठराव ग्रामस्थ संजय मनवे यांनी मांडला.

सिनारमाससाठी पर्यावरणाचा बळी! एमआयडीसीच्या बेकायदेशीर कत्तलीवर भाजप नेत्यांचा संताप, गुन्हे दाखल करण्याची मागणी

नेरळ ग्रामपंचायतमधील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून देण्यात येणारे पाणी यांची करवाढ करण्याचा विषय ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी मांडला. पाणीपट्टी करण्यास बहुसंख्य ग्रामस्थांनी विरोध करीत आधी दोनवेळ पुरेसे पाणी द्या आणि नंतरच पाणीपट्टी वाढ करण्यात यावी अशी भूमिका सूर्यकांत चंचे,सावळाराम जाधव,अक्षय चव्हाण,ॲड सुमित साबळे,सिद्धार्थ सदावर्ते, सुभाष नाईक,परेश सुर्वे,आदी सह अनेक ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यानंतर सर्वानुमते मासिक पाणीपट्टी 210 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नेरळ ग्रामपंचायत ने 2013 मध्ये 60 रुपये मासिक घरपट्टी 125 प्रति महिना करण्यात आली होती. त्यानंतर 12 वर्षांनी नेरळ गावातील पाणीपट्टी वाढ करण्यात आली असून फेब्रुवारी 2026 पासून ही घरपट्टी वाढ लागू होणार आहे.या कालावधीत सर्व थकीत पाणीपट्टी वसुलीचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन प्रशासक सुजित धनगर यांनी दिले.तर नेरळ गावातून जाणाऱ्या मध्य रेल्वेचे पाडा येथील फाटक रेल्वे कडून बंद करण्यात येणार आहे,त्या ठिकाणी भुयारी मार्ग बनवण्यात यावा असा ठराव सूर्यकांत चंचे यांनी मांडला आणि त्या ठरावाला सर्वांनी पाठिंबा दिला.

Karjat News : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी न दिल्यास….; मनसेचा रेल्वेला गंभीर इशारा!

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीबाबत काय निर्णय झाला?

    Ans: नेरळ ग्रामसभेत चर्चेनंतर मासिक पाणीपट्टी 210 रुपये करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. ही वाढ फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे.

  • Que: पाणीपट्टी वाढीस ग्रामस्थांचा विरोध होता का?

    Ans: होय. अनेक ग्रामस्थांनी आधी दोन वेळा पुरेसे पाणीपुरवठा करा, नंतरच पाणीपट्टी वाढ करा अशी ठाम भूमिका मांडली होती. मात्र चर्चेनंतर तडजोडीने निर्णय घेण्यात आला.

  • Que: नेरळ ग्रामपंचायतीकडे घरपट्टी किती थकीत आहे?

    Ans: नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांकडे सुमारे 90 लाख रुपयांची घरपट्टी थकीत आहे.

Web Title: Karjat news campaign to recover outstanding house rent neral gram sabha approves increase in water rent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • karjat news
  • neral
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?
1

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?

नेरळ ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी! थकीत घरपट्टी सवलतीचा ठराव फेटाळला
2

नेरळ ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी! थकीत घरपट्टी सवलतीचा ठराव फेटाळला

Karjat News : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी न दिल्यास….; मनसेचा रेल्वेला गंभीर इशारा!
3

Karjat News : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी न दिल्यास….; मनसेचा रेल्वेला गंभीर इशारा!

Raigad News: कर्जतमध्ये मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा २४ तास पहारा, मतमोजणी ठिकाणापासून १०० मीटर पर्यंत प्रवेश बंदी
4

Raigad News: कर्जतमध्ये मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा २४ तास पहारा, मतमोजणी ठिकाणापासून १०० मीटर पर्यंत प्रवेश बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.