Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५ कोटींच्या पुलाचा खर्च वाया? नेरळ-कळंब रस्त्यावरील नवीन पुलाखालील काँक्रीटीकरण गेले वाहून

नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील नवीन पुलाच्या पायाखालील काँक्रीटीकरण वाहून गेल्याने २५ कोटी खर्चाच्या पुलाचे पुढे काय होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 20, 2025 | 08:56 PM
२५ कोटींच्या पुलाचा खर्च वाया? नेरळ-कळंब रस्त्यावरील नवीन पुलाखालील काँक्रीटीकरण गेले वाहून

२५ कोटींच्या पुलाचा खर्च वाया? नेरळ-कळंब रस्त्यावरील नवीन पुलाखालील काँक्रीटीकरण गेले वाहून

Follow Us
Close
Follow Us:

संतोष पेरणे/ कर्जत: माथेरान–नेरळ–कळंब राज्यमार्गावरील दहिवली मालेगाव येथे उल्हास नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामाला २०२४ मध्ये सुरुवात झाली असून काही पिलर उभे राहिले आहेत. मात्र, या पिलरखालील काँक्रीटीकरण अलीकडील पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे पुलाच्या पाया भागाला धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराच्या “चोचल्यांसाठी” काम करत आहे काय, असा प्रश्न स्थानिक वाहनचालक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. “बांधकाम विभाग जनतेसाठी काम करतो की ठेकेदारासाठी?” अशी टीकाही होत आहे.

दहिवली मालेगाव येथे उल्हास नदीवरील जुना पूल सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधला गेला होता. तो कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात महापुरामुळे पुलावरून वाहतूक ठप्प होते. त्यामुळे येथील नागरिकांनी अनेक वर्षांपासून नव्या पुलाची मागणी केली होती. आमदार महेंद्र थोरवे यांनी या पुलासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यानंतर या प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली.

राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

सुमारे २५ कोटी रुपयांच्या खर्चाचा हा पूल १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही पुलाचे अर्धे कामसुद्धा पूर्ण झालेले नाही. ठेकेदार कंपनीने फक्त आठ पिलर उभे केले असून कामाची गती अत्यंत संथ आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारावर कोणतीही कारवाई किंवा नोटीस न दिल्याने प्रशासनावरील प्रश्नचिन्ह वाढले आहे.

पिलरखालील काँक्रीटीकरण पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने पुलाची मजबुती धोक्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव स्पष्ट दिसत असून पुलाचे भवितव्य काय होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नवीन नागपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश; रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडणार, मालमत्ता व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापणार

श्रावण जाधव (रिक्षाचालक) यांनी सांगितले की दहिवली मालेगाव पुलाचे काम जनतेसाठी सुरू आहे की ठेकेदारासाठी, हेच आता समजत नाही. कामाला दीड वर्ष पूर्ण झाले तरी पुलाचे खांबही नीट उभे राहिलेले नाहीत. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी आमची मागणी आहे.

Web Title: Karjat news concrete under the new bridge on neral kalamb road washed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 08:56 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?
1

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?

Ahilyanagar News: उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या; विभागप्रमुखांनाही सवाल
2

Ahilyanagar News: उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या; विभागप्रमुखांनाही सवाल

Kolhapur Gas Shortage :  सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी
3

Kolhapur Gas Shortage : सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल
4

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.