
कर्जत तालुक्यातील नेरळ विकास प्राधिकरण हद्दी असलेल्या ममदापुर ग्रामपंचायत मधील ममदापुर वाडी कडे जाणाऱ्या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. रस्त्यातील खडे आणि पावसाळ्यात त्या खड्ड्यात साठणारे पाणी यामुळे रस्त्याची अवस्था खड्ड्यांमध्ये हरवलेल्या रस्त्यांसारखी झाली होती. स्थानिक आदिवासी लोकांनी अनेक वर्षे रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी केली जात होती.मात्र रस्त्यावर काँक्रीटीकरण करावे अशी मागणी प्राधिकरण कडे केली जात होती.परंतु रस्त्याची अवस्था पाहता प्राधिकरणाने चक्क तेथे डांबरीकरण केले आहे. मात्र त्यातही डांबरीकरण कामाचा दर्जा नित्कृष्ट असल्याने अवघ्या 15 दिवसात डांबर बाहेर आले आहे.
ममदापुर नवीन वसाहत पासून आखाडा वाडी आणि तेथून पुढे दिलकॅप कॉलेज पासून पुढे ममदापुर वाडी असा रस्ता बनविला गेला आहे. ममदापुर वाडी पर्यंत बनवलेल्या रस्त्यावर आताच खडी बाहेर आली आहे.त्यामुले अशा नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी शासन करणार आहे काय? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. अनेक वर्षांनी हा रस्ता बनविण्यात आला असल्याने काही महिन्यातच हा रस्ता खराब झाला तर यावर्षी पावसाळ्यातच रस्त्यावरून चालणे कठीण होऊ शकते आणि त्यामुळे रस्त्याचे काम चांगलंय दर्जाचे करून घेण्यात यावे अशी मागणी आदिवासी ग्रामस्थ करीत आहेत.