Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी; गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त

महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 01, 2026 | 02:46 PM
Karjat News : अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी; गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त
Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी;
  • गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त
कर्जत/संतोष पेरणे : महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यात असलेल्या मोठ्या गावात तालुक्यातील सर्व श्री सदस्य रस्त्यावर उतरले होते.तालुक्यातील किमान 4000 श्री सदस्य रस्त्यावर आल्यानंतर आज कर्जत तालुका चकाचक दिसून आला.

तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त देशभरात स्वच्छता अभियान पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगडभूषण डॉ श्री सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.स्वच्छता हा समाजसेवेचा महत्त्वाचा भाग मानून गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. विशेषतः ‘गाव स्वच्छता अभियान’ हा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर राबवला जात आहे. कर्जत तालुक्यात एकूण ३४ बैठकींमधून हजारो श्रीसदस्य या अभियानात सहभागी झाले आहेत.कर्जत तालुक्यातील नेरळ,माथेरान,कर्जत आणि कशेळे या चार ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.श्री बैठक कशेळे येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळे श्री बैठक गुढवण, श्री बैठक पाथरज, श्री बैठक वारे, श्री बैठक चाफेवाडी, श्री बैठक कोळीवली या सर्व बैठकी मधून या स्वच्छता अभियानासाठी श्री सदस्य लाभले होते.

Raigad News: मुरुड एसटी आगारात CNG पंपाला नकार! प्रवाशांनी व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

या स्वच्छता मोहिमेत कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय कशेळे, जिल्हा परिषद शाळा, स्मशानभूमी, हनुमान मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, कशेळे मार्केट आणि आजूबाजूचा परिसर श्री दास एकत्र येत या स्वच्छता अभियानातून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय कशेळे येथील कर्मचारी वर्गाकडून या स्वच्छता अभियान उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

सदस्य महेश वैखरे 
आदरणीय तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांचा एक मार्च जन्मदिवस असल्याने स्वच्छता अभियान राबवला जात आहे. आणि त्यांचा वाढदिवस संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबवून साजरा केला जात आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान द्वारे रक्तदान शिबिर, वृक्षरोपण लागवड व संवर्धन करणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे, ऐकण्यासाठी श्रवण यंत्राच्या ही वाटप केले जातात, अपंग व्यक्तींना व्हीलचेअर देण्याचे काम या प्रतिष्ठान द्वारे केले जातात, रस्ता सुरक्षा ते साठी महाराष्ट्र पोलिसांकडे बॅरिगेटचेही वाटप करण्यात आले आहे.

प्रथम गाव स्वच्छता नंतर तालुका नंतर जिल्हा आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण देश अशा संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान राबवले जात आहे. सुरुवात आपल्या स्वतःपासून आपल्या घरापासून केली तर पूर्ण देशापर्यंत स्वच्छता अभियान राबवले जात आहे. आपल्या अंतरीचा कचरा साफ करा बाहेरचा कचरा आपोआप साफ होईल अशी शिकवण बैठकांमध्ये दिली जात आहे.

Karjat News : पोशीर धरणाला विरोध कायम ; जमिनीसाठी शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

 

Web Title: Karjat news finally the cleanliness campaign was successful the taluka became garbage free thanks to the hard work of the villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने
1

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

Hassan Mushrif : गोकुळ भ्रष्टाचाराचा पैसा भाजपविरोधात? शिवाजीराव पाटील यांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप
2

Hassan Mushrif : गोकुळ भ्रष्टाचाराचा पैसा भाजपविरोधात? शिवाजीराव पाटील यांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप

Solapur News : एलपीजी दरकपातीसाठी सोलापूरचे रिक्षाचालक रस्त्यावर; ‘सोलापूर बंद’चा इशारा
3

Solapur News : एलपीजी दरकपातीसाठी सोलापूरचे रिक्षाचालक रस्त्यावर; ‘सोलापूर बंद’चा इशारा

Parbhani : पडेगावात पुतळ्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! 35जण पोलिसांच्या ताब्यात 
4

Parbhani : पडेगावात पुतळ्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! 35जण पोलिसांच्या ताब्यात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.