
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्याला आणि शहराला मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे येथील सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी कर्जत शहरात मराठी नाट्य सृष्टीत गोविंदग्रज म्हणून ओळखले जाणारे राम गणेश गडकरी यांच्या नावाने नाट्यगृह उभारले जाईल असा जाहीर शब्द राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांनी दिला.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फेव्हिकल का जोड तुटेगा नाही असे सांगत ही जोडगोळी एकत्र आली तर कर्जत मध्ये विकासाचा गाडा वेगाने पुढे जाईल असे जाहीर केले. त्यानंतर आघाडीवर टीका करत म्हणाले की, ज्यांची आघाडी अभद्र आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलावे.कर्जतसाठी काही करण्याची इच्छा नसलेली ही त्यांची परिवर्तन आघाडी आहे. या ठिकाणी आमची नैसर्गिक युती सक्षम असून आरपीआय देखील आमच्यासोबत पाठीशी ठाम आहेत.या भागाला फार मोठी परंपरा असून अनेक कलाकार या भागातून पुढे आले आहेत.त्यासाठी राम गणेश गडकरी नाट्यगृह या भूमीत उभे केले जाईल असा राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून शब्द देतो असं शेलारांनी सांगितलं.
दरम्याने त्याचवेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करीत असून महायुती म्हणून परिवर्तन आघाडी नसून परिवर्तन करण्याच्या वल्गना करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल.कर्जत शहरात विरोधकांनी विरोध करण्यासाठी उमेदवार दिले आहेत.ते उमेदवार हे फारसे शिक्षित नाहीत आणि त्यांचा उद्देश हा प्रामुख्याने आपल्या हाती चाव्या असाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.कर्जत आणि माथेरान मधील नागरिकांनी विकास काय असतो हे पाहिले आहे आणि त्यामुळे मतदार हा कायम विकासाला साथ देतो, हे या निवडणुकीत देखील दिसून येईल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला.
माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत शहरातील राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील अनेक पुलांची कामे, रेल्वे उड्डाण पूल यांची कामे अर्धवट आहेत ती पूर्ण करावीत असे आवाहन केले.कर्जत शहर आणि पलीकडील भिसेगाव आणि गुंडगे यांना जोडण्याची गरज आहे अशी मागणी केली. या कॉर्नर सभेला भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी,शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर, आरपीआय कोकण संघटक राहुल डाळिंबकर,भाजप जिल्हा चिटणीस दीपक बेहेरे,तसेच भाजपचे वसंत भोईर,किरण ठाकरे,मंगेश म्हसकर,कल्पना दास्ताने,माजी नगराध्यक्ष शरद लाड,राजेश लाड,तसेच थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वाती लाड,स्थानिक उमेदवार ॲड संकेत भासे,कोयल कन्हेरीकर, विशाखा जिनगरे,रामदास गायकवाड,जान्हवी देवघरे,आदी तीन प्रभागातील सह उमेदवार उपस्थित होते.
Ans: महायुती ऐतिहासिक विजयाकडे जात आहे. विरोधकांचे उमेदवार अननुभवी व फारसे शिक्षित नसल्याचा आरोप केला. कर्जत–माथेरान भागातील विकास कामांमुळे जनता पुन्हा विकासाला साथ देईल, असा विश्वास व्यक्त केला.
Ans: राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट पुलांची व रेल्वे उड्डाण पुलांच्या कामांची पूर्तता करावी. कर्जत–भिसेगाव–गुंडगे जोडणी गरजेची असल्याचे सांगितले. नगरपरिषद निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली.
Ans: भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, आरपीआयचे राहुल डाळिंबकर, भाजपचे दीपक बेहेरे, तसेच अनेक पदाधिकारी आणि तीन प्रभागातील उमेदवार, ज्यात स्वाती लाड (नगराध्यक्ष पद), संकेत भासे, कोयल कन्हेरीकर, विशाखा जिनगरे, रामदास गायकवाड, जान्हवी देवघरे आदी उपस्थित होते.