Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : वाहतूक कोंडीच्या समस्येवर नागरिकांना दिलासा; राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई सुरू

कशेळे–कोठीबे आणि कशेळे–खांडस या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. आता यावर तोडगा काढण्यात आलेला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 25, 2025 | 02:37 PM
Karjat News : वाहतूक कोंडीच्या समस्येवर नागरिकांना दिलासा; राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई सुरू
Follow Us
Close
Follow Us:
  • वाहतूक कोंडीच्या समस्येवर नागिकांना दिलासा
  • राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई सुरू
कर्जत/संतोष पेरणे : शहापूर मुरबाड कर्जत हा राष्ट्रीय महामार्ग कशेळे गावातून जातो. त्याचवेळी उरण पनवेल नेरळ भीमाशंकर हा राज्यमार्ग देखील कशेळे गावातून जातो. त्याचवेळी कशेळे खांडस या प्रमुख जिल्हा मार्ग देखील गावातून जात असून या सर्व प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे करून बंधाकमे झाली आहेत. हि सर्व बांधकामे तोडण्यास सुरुवात झाली असून त्या निमित्ताने स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
‎
कशेळे गावातून जाणाऱ्या कशेळे–मुरबाड, कशेळे–कर्जत, कशेळे–नेरळ, कशेळे–कोठीबे आणि कशेळे–खांडस या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.विक्रेते व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे बस, जड वाहने तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.हि सर्व अतिक्रमणे काढण्यात यावी यासाठी कशेळे व्यापारी संघटना अनेक वर्षे मागणी करीत आहे. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाने हि सर्व अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली असून कशेळे गावात या सर्व प्रमुख रस्त्यावर सुरु झाली आहे.पोलीस संरक्षणातअतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

यावेळी ग्रामस्थ, कशेळे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त पाहणीत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली.कारवाईदरम्यान अतिक्रमण केलेल्या रस्त्याच्या भागांना रंगाने स्पष्टपणे चिन्हांकित करण्यात आले असून संबंधित विक्रेते व दुकानदारांना दोन दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Karjat News : अखेर उपोषण 12 तासांनी सुटलं; टाटा जलविद्युत प्रकल्प विरोधातील आंदोलनकर्त्यांची माघार

दरम्यान, कशेळे नाक्यावरील जुना एसटी बस थांबा देखील अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचा गंभीर मुद्दा ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. बस थांब्याची जागा व्यापली गेल्यामुळे जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना थेट रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असल्याची तीव्र चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कोठीबे मार्गावरील एसटी बसला वारंवार मागे–पुढे करावे लागत असल्याचे चित्र होते, तर नेरळकडे जाणाऱ्या कंटेनर व जड वाहनांना वळण घेताना अडथळे येत होते. खांडस रस्त्याकडील वळणावरही अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढला होता. या सर्व बाबी प्रशासनाच्या पाहणीत स्पष्ट झाल्या.त्यात ग्रामस्थांनी अतिक्रमण हटविणे ही काळाची गरज असून रस्ते आणि सार्वजनिक सुविधा मोकळ्या ठेवल्या पाहिजेत. विशेषतः जुना एसटी बस थांबा तातडीने अतिक्रमणमुक्त करून प्रवाशांसाठी सुरक्षित थांबा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

‎सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींनी अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती तसेच बस थांब्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. पोलीस प्रशासनाने कारवाईदरम्यान शांतता राखण्यात येईल आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल, असे स्पष्ट केले.कशेळेतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून, दिलेल्या मुदतीनंतर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Karjat News : शेतीला पुरवठा करणाऱ्या कालव्याची दुरावस्था, शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

💡

Frequently Asked Questions

  • Que: कशेळे गावात अतिक्रमण हटाव मोहीम का राबविण्यात येत आहे?

    Ans: कशेळे गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांना त्रास होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे.

  • Que: कोणकोणत्या रस्त्यांवर अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे?

    Ans: कशेळे–मुरबाड, कशेळे–कर्जत, कशेळे–नेरळ, कशेळे–कोठीबे आणि कशेळे–खांडस या सर्व प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे.

  • Que: तिक्रमणांमुळे नागरिकांना कोणत्या अडचणी येत होत्या?

    Ans: अतिक्रमणांमुळे बस, जड वाहने व खासगी वाहनांची वाहतूक अडथळ्यात येत होती. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत होते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता.

Web Title: Karjat news relief for citizens on traffic congestion action taken against encroachments on national highways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : शेतीला पुरवठा करणाऱ्या कालव्याची दुरावस्था, शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
1

Karjat News : शेतीला पुरवठा करणाऱ्या कालव्याची दुरावस्था, शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

Karjat News : अखेर उपोषण 12 तासांनी सुटलं; टाटा जलविद्युत प्रकल्प विरोधातील आंदोलनकर्त्यांची माघार
2

Karjat News : अखेर उपोषण 12 तासांनी सुटलं; टाटा जलविद्युत प्रकल्प विरोधातील आंदोलनकर्त्यांची माघार

Karjat News : भव्य विज्ञान प्रदर्शन; आपत्कालीन यंत्रणेवर आधारित विद्यार्थ्यांचे सुचक प्रकल्प
3

Karjat News : भव्य विज्ञान प्रदर्शन; आपत्कालीन यंत्रणेवर आधारित विद्यार्थ्यांचे सुचक प्रकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.