
Raigad News: दुष्काळातही बंधाऱ्याला झडपा नाहीत! कर्जतमध्ये सरकारच्या पाणी अडवण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह, ग्रामस्थ संतप्त
तुकाराम मुंढेंना धक्का ! थेट मंत्रिमहोदयांनीच बदलला ‘तो’ निर्णय; कारवाईलाच स्थगिती
राज्यात सन २०२६ च्या खरीप हंगामात ‘ट्रिगर-१’ आणि ‘ट्रिगर-२’ अंतर्गत दुष्काळ लक्षात घेऊन पाण्याचे दुर्भिक्ष व संभाव्य अल-निनो परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. पाणी अडवणे दृष्टीने सर्व बंधाऱ्यांवर गेट किंवा फळ्या बसवून पाणी अडवले जाण्याच्या सूचना दिल्या. मनरेगा, जिल्हा नियोजन निधी, तसेच खासदार आणि आमदार निधीच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे, असा सरकारला आशावाद आहे. कर्जत तालुक्यात वनराई बंधारे बांधले जात आहेत.
कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या नद्यांमध्ये नाल्यावर बांधलेले सिमेंट बंधाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी अडवण्याचा कार्यवाही सरकारने केलेली नाही. कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील बेकरे पूल येथे आठ नळपाणी योजना अवलंबून असलेल्या सिमेंट बंधाऱ्याला अद्याप झडपा लावलेल्या नाहीत. पाली भूतिवली धरणांमधून वाहून येणारे पाणी अडवण्यासाठी आणि उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी येथे जिल्हा परिषदेकडून सिमेंट बंधारा बांधला आहे. मात्र त्या बंधाऱ्याला दुष्काळाच्या फटका बसत असून देखील लोखंडी प्लेट लावून पाणी अडवण्याची आठवण कर्जत तालुक्याला प्रशासनाला नाही.
याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून तालुक्यात दुष्काळ स्थिती असताना केवळ बोलायला पाणी अडवण्याची मोहीम हाती घेतली आहे काय? असा सवाल उपस्थित केला आहे. तर माजी सदस्य ॲड. जयेंद्र कराळे यांनी हेच का सरकारचे पाणी अडवण्याचे धोरण असा टोला मारला आहे. तेथील पाणी साठवण बंधाऱ्याचे झडपा बसविल्या नाहीत आणि तेथे सांडवा फुटला असून देखील त्याकडे पाहायला सरकारला वेळ नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.