रायगड किल्ल्याचं वास्तू वैभव परतणार; पुरातत्व आणि स्थापत्य शास्त्राच्या आधारे अभ्यासपूर्ण चित्रांची निर्मिती
मुंबई : किल्ले रायगडाचे वास्तुवैभव म्हणजे शिवकालीनच्या रायगडाने आजही जपलेल्या पाऊलखुणा. त्या जपण्यासाठी किल्ले रायगडावरील शिवकालीन वास्तूंच्या पुनर्बाधणीसाठीचे प्रयत्न युवा पिढीकडून सुरू आहेत. नगारखाना आणि राजवाड्याचे मनोरे वा स्तंभ पुन्हा आहे तसे उभे राहावेत, यासाठी रायगड विकास प्राधिकरणामार्फत पाठपुरावा सुरू झाला आहे.
मुंबईत जैन समाजाचा विराट मोर्चा; लाखो समाजबांधव रस्त्यावर, मंदिर पाडल्यावरुन महापालिकेचा निषेध
ऐतिहासिक संदर्भ, पुरातत्त्व शास्त्राचा आधार आणि स्थापत्य ज्ञान याचा समन्वय साधून रायगडावरील ढासळलेल्या शियकालीन वास्तू मूळ स्थितीत उभारण्यासाठी हुबेहूब चित्रे साकारण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य कोल्हापुरातील युवा अभ्यासकांनी हाती घेतले आहे. त्यासाठी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व विभागाची बैठक होत आहे. किल्ले रायगडावरील नगारखाना आणि मनोरे हे ‘कोअर मॉन्युमेंट’ असल्याने त्यांचे जतन-संवर्धन ‘एएसआय’, तर ‘पेरिफेरल’ अर्थात गड आणि परिसरातील तटबंदी, नाणे दरवाजा, खुबलढा बुरुज, हत्ती तलाव आदींची कामे रायगड विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहेत.
पहिल्या टप्प्यात रायगडावरील राजदरबाराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नगारखान्यासह शेजारच्या ओवन्यांचे चित्र दोन-तीन वर्षे त्यांच्या किल्ले रायगड वाऱ्या सुरू आहेत. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.
शिवकाळातील वस्तूंचे तत्कालीन स्थापत्याचे नकाशे, अत्यावित्रे उपलब्ध नसल्याने वास्तूच्या ठिकाणी उपलब्ध असणारे चौथरे, भिंतींची रचना, वास्तूंची तंतोतंत मापे, तत्कालीन स्थापत्याचे बारकावे, सामाजिक-सास्कृतिक प्रभाव या गोष्टीच्या अभ्यासासह ऐतिहासिक सदर्भ, पुरातत्त्वीय शास्त्राच्या आधारे अभ्यासपूर्ण वास्तुचित्रे उभारली आहेत, अशी माहिती आर्किटेक्ट अमोल पाटणकर यांनी दिली.
शिवछत्रपतीचा रायगड कसा होता, याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. यामुळे गडावरील पडझड झालेल्या शिवकालीन वास्तूंची जशीच्या तशी अभ्यासपूर्ण चित्रे काढण्याचे काम सुरू आहे. यासाठी ऐतिहासिक संदर्भासह पुरातत्त्व आणि स्थापत्य शास्त्राचा आधार घेतला जात आहे. या चित्रांचा उपयोग रायगडावरील वास्तूंच्या पुनर्बाधणीसह शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांकरिता होऊ शकतो, असं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे.