photo Credit- Social Media राज ठाकरे -उद्धव ठाकरे एकत्र येणार; राज्यात नव्या समीकरणांची नांदी
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. 2006 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरेंपासून वेगळे होऊन त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी मनसे नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. यानंतर, एकेकाळी बाळ ठाकरेंचे करण-अर्जुन म्हणून ओळखले जाणारे उद्धव आणि राज ठाकरे यांचे मार्गही वेगळे झाले. पण आता राज यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करण्याचे मोठे संकेत दिले आहेत.
मनसेकडून निवडणूक लढवणारे चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, माझे उद्धव ठाकरेंशी राजकीय मतभेद असू शकतात, परंतु जर आपल्याला महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे लागले तर मी त्यासाठी तयार आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. ही भांडणे आणि वाद महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी खूप महागात पडत आहेत. म्हणून जर आपण दोघे एकत्र आलो तर मला काही अडचण वाटत नाही. पण मुद्दा फक्त इच्छाशक्तीचा आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा आणि हिताचा विषय आहे. याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण करू इच्छिणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला पाहिजे असे माझे मत आहे. असे राज ठाकरे म्हणाले.
Ajit Pawar News: छत्रपती कारखाना वाचविण्याची अजित पवारांना साद;बारामतीत नेमकं चाललयं काय?
राज यांच्या विधानाबाबत उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक संदेश दिला आहे. महाराष्ट्र-मराठीच्य हितासाठी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे, पण माझी एकच अट आहे. महाराष्ट्राच्य हिताच्या आड जो कोणी येईल त्याला घरात बोलावयचे नाही. त्याचे स्वागत करायचे नाही. मराठ माणसांनी आता ठरवावे की भाजपासोबत जायचे की माझ्यासोबत यायचे. महाराष्ट्राचे हित कोणामुळे आहे हे पहा. महाराष्ट्राचे हित ही एकच शर्त आहे. या चोरांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत. कळत नकळत पाठिंबा दयायचा नाही, किवा प्रचार करायचा नाही ही शिवरायांची शपथ घ्या मग टाळी दयायची हाळी करा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय राऊत यांनी मवाळ भूमिका घेत उद्धव आणि राज दोघेही भाऊ आहेत व त्यांचे नाते अबाधित आहे असे सांगितले. आमच्या पक्षांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात, परंतु महाराष्ट्राचे हित आमच्या दोघांसाठीही सर्वोपरि आहे. आज भाजपा हा महाराष्ट्राचा नंबर एकचा शत्रू आहे. ज्या पद्धतीने भाजपाने शिवसेनेला फोडले आहे. राज ठाकरे भाजपाला महाराष्ट्राचा शत्रू मानत असतील तर त्यांच्या नेत्यांना त्यांच्या घरात स्थान देऊ नये, यानंतर राज ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे संतापले. ते म्हणाले की, काँग्रेससोबत युती करून सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला अटी लादण्याचा नैतिक अधिकार नाही.
मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना आनंद होईल. कोणी आपले मतभेद विसरून एकत्र येत असेल तर वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही.