Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाड नगरपरिषदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच CCTV बंद, देखभालीसाठी निविदाच नाही?

महाड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासह इमारतीतील बहुतांश CCTV कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर सवाल उपस्थित होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2026 | 02:27 PM
Raigad News: महाड नगरपरिषदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच CCTV बंद, देखभालीसाठी निविदाच नाही?

Raigad News: महाड नगरपरिषदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच CCTV बंद, देखभालीसाठी निविदाच नाही?

Follow Us
Follow Us:
  • महाड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील बहुतांश CCTV कॅमेरे बंद असून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातही कॅमेरा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.
  • CCTV देखभाल-दुरुस्तीसाठी गेल्या काही वर्षांत निविदा प्रक्रिया न झाल्याने सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • मुख्याधिकाऱ्यांवरील कथित मारहाण प्रकरणात CCTV फुटेज उपलब्ध नसल्याने महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक पुरावा मिळू शकला नाही.
महाड: महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांवर महिनाभरापूर्वी भाजप नगरसेवकाने कथित मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली असून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे तर इमारतीतील बहुतांश कॅमेरेही बंद अवस्थेत असल्याचे समजते. त्यामुळे संवेदनशील शासकीय कार्यालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत पुण्यात यंदा रस्त्यांवर खड्डे कमी; महापौर मंजुषा नागपुरे यांचा दावा

महाड शहरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र स्वतःच्या प्रशासकीय अंतर्गत इमारतीतील सुरक्षेबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर अंतर्गत भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचे दिसून येते.

देखभाल-दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया संबंधित विभागातील माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी, आज केवळ दोन ते चार कॅमेरेच सुरू असून तेही पूर्णपणे कार्यक्षम नसल्याचे सांगितले जाते. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत दररोज नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या व्यक्तींची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सभापती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनांसह महत्त्वाच्या भागात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक मानले जाते. मात्र प्रत्यक्षात त्याकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे दिसते.

दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल

मुख्याधिकाऱ्यांवरील कचित मारहाण प्रकरणात दोन्ही बाजूनी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. अशा वेळी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज हा तपासासाठी महत्वाचा पुरावा ठरू शकला असता. मात्र मुख्याधिकाऱ्याऱ्यांच्या दालनातच कार्यरत सीसीटीव्ही नसल्याने महत्वाचा इलेक्ट्रॉनिक पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आधुनिक कॅमेरे बसविण्याची गरज

नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील बंद असलेले सर्व सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करून महत्त्वाच्या ठिकाणी आधुनिक कॅमेरे बसविण्याची गरज व्यक्त होत आहे. एकंदरीत भविष्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे असून यावर प्रशासनाने गांभीयनि लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

‘नागरिकांच्या जीवाशी खेळू नका’, डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल, संप मागे

देखभालीसाठी निविदाच नाही?

संबंधित विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी गेल्या काही वर्षात स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे बंद पडलेले अनेक कॅमेरे अद्याप दुरुस्त झालेले नाहीत. नियमित देखभालीअभावी सुरक्षा व्यवस्था कमकुवत झाल्याचे चित्र असून, याबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही पुढे येत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad municipal council security under question as cctv cameras remain non functional

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
1

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
2

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
3

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
4

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.