Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Jamui Molestation Case: आरोपींनी अल्पवयीन मुलीशी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करत तिचा विनयभंग केला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. देशभरातून संताप: हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार सरकार आणि तेथील पोलीस प्रशासनाच्या कायदा-सुव्यवस्थेवर देशभरातून तीव्र टीकेची झोड उठली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 22, 2026 | 03:24 PM
Jamui Molestation Case, Bihar Police Encounter

Jamui Molestation Case, Bihar Police Encounter

Follow Us
Follow Us:
  • जमुई जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील २ मुख्य आरोपींचा एन्काउंटर.
  • पळून जाण्याच्या प्रयत्नात नंदन यादवच्या पायात गोळी लागली, तर हरेराम यादवचा पाय मोडला.
  • चकमकीनंतर दोन्ही जखमी आरोपींना उपचारासाठी जमुई सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Jamui Molestation Case:  बिहारच्या जमुई जिल्ह्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणावर बिहार सरकार आणि पोलिसांवर टिकेची झोड उठली होती. अशातच या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा कारवाईदरम्यान या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी, नंदन यादव आणि हरेराम यादव, अशी या दोन आरोपींची नावे असून दोघेही सज्ञान आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विनयभंगाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी तातडीने आरोपींची धरपकड सुरू केली. पण आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चकमकीत दोन आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. यात एक आरोपीच्या पायाला गोळी लागली तर दुसऱ्याचा पाय मोडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर दोन्ही आरोपींना जमुई सदर रुग्णालयात नेण्यात आले. आरोपींना रुग्णालयात नेत असल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Bihar Minor Girl Harassment Video: बिहारच्या रस्त्यांवर मुली सुरक्षित का नाहीत? छेडछाडीच्या ‘त्या’ व्हिडीओवरून राहुल गांधी आक्रमक

पोलिसांनी मोठी आणि आक्रमक मोहीम सुरू केली

जुमईमध्ये चार-पाच दिवसांपूर्वी १०वीत शिकणारा एक अल्पवयीन मुलगा आणि एक मुलगी सायंकाळच्या वेळी एक क्लासवरून परतत असताना काही जणांच्या घोळक्याने या दोघांनाही अडवून पीडित मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करत तिचा विनयभंग केला. या घटनेचा व्हिडीओही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून बिहार सरकारवर टिकेची झोड उठली होती. यानंतर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांविरोधात मोठी आणि आक्रमक मोहीम सुरू केली.

आरोपींना पकडण्यासाठी जिल्ह्यातील विविध संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर कसून छापे टाकण्यात आले. याच दरम्यान, पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये कथित चकमक झाल्याचे वृत्त समोर आले. या चकमकीदरम्यान, छाप्यादरम्यान एका आरोपीच्या पायाला गोळी लागली, तर दुसऱ्याचा पाय मोडला.

 

कुंदर बॅरेकजवळ पोलीस आणि गुन्हेगारांमधील चकमक

आरोपींना पकडण्यासाठी छापा टाकत असताना पोलीस पथकाचा गुन्हेगारांशी सामना झाला. मुख्य आरोपी नंदन यादव याच्या पायाला छाप्यादरम्यान गोळी लागल्याचे सांगितले जात आहे. त्याचा साथीदार हरेराम यादव याचा पाय मोडल्याचे वृत्त आहे. पण या संपूर्ण चकमकीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. नंदनला पकडण्यासाठी कुंदर बॅरेकजवळ पोलीस आणि गुन्हेगारांमधील चकमक झाल्याचे बोलले जात आहे.

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला

१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताचा प्रकार

मुख्य आरोपी, नंदन यादव आणि हरेराम यादव, दोघेही सज्ञान आहेत. दोघेही प्रतापपूर गावचे रहिवासी असून व्यवसायाने ट्रॅक्टर चालक आहेत. पोलिसांवर हल्ला करून पळून जात असताना नंदनच्या पायाला गोळी लागली, तर पळून जाताना हरेरामचा पाय मोडला. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे एसआयटी उर्वरित एकाचा शोध घेत आहे.

दोन्ही जखमींना पोलीस कोठडीत जमुई सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता, समाजकंटकांच्या एका गटाने मडवा पहाडजवळ स्कूटरवरून जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला जबरदस्तीने थांबवले, त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला.

 

Web Title: Jamui molestation case accused nandan and hare ram injured in police encounter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Marathi News
  • Molestation Case

संबंधित बातम्या

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
1

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?
2

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
3

Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका
4

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.