Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

महाड-रायगड मार्गाचे काम आता पूर्ण होेण्याच्या वाटेवर आहे. हे काम पूर्णत्वाकडे जात असतानाच नव्या मार्गाच्या साईडपट्टीवर महावितरणकडून विद्युत केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. महाडने महावितरणला काम तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2026 | 03:11 PM
Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • नव्या मार्गाच्या साईडपट्टीवर महावितरणकडून विद्युत केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू
  • कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे महामार्ग विभागाचे निर्देश
  • रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणकडून केबल टाकण्यासाठी साईडपट्टीचे यांत्रिक पद्धतीने खोदकाम सुरू
महाड: ऐतिहासिक किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या महाड-रायगड मार्गाचे दुपदरीकरण, रुंदीकरण काम आता अंतिम टप्प्यात पोहचून पूर्णत्वाकडे जात असतानाच आता याच नव्या मार्गाच्या साईडपट्टीवर महावितरणकडून विद्युत केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता हे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, महाडने महावितरणला काम तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे नव्याने विकसित झालेल्या रस्त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Pune News: गणेशोत्सव 2026 मध्ये 108 रुग्णवाहिकांची अखंड सेवा! वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेल्या रुग्णांना तात्काळ मदत

या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश महामार्ग विभागाने दिले असून, पत्राची प्रत संबंधित राष्ट्रीय महामार्ग व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रकल्प सल्लागार संस्थेलाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्याच रस्त्याच्या हद्दीत सुरू झालेले हे खोदकाम आता अधिकृत परवानगीच्या प्रक्रियेत अडकले असून, महामार्ग विभागाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

परवानगी मिळेपर्यंत या कामासाठी कोणतीही यंत्रसामग्री, मजूर अथवा एजन्सी तैनात करू नये, असेही बजावण्यात आले आहे. अनधिकृत कामामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित एजन्सी अथवा महावितरणची राहील आणि झालेले नुकसान त्यांच्या स्वखर्चाने पूर्ववत करावे लागेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

CJP Protest : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक, मुंबईत आंदोलनाची घोषणा

यांत्रिक पद्धतीने खोदकाम

महाड-रायगड मार्गावर रायगड किल्ल्यावरील विविध कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडी आणि वाहन पार्किंगची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर तसेच किल्ले रायगडाच्या संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले, राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत करण्यात आलेल्या या कामाला एनएच-१६६ असा क्रमांक देण्यात आला आहे. महाड ते रायगड किल्ला या एकूण २५.६०९ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे पेव्हड शोल्डर्ससह दौन पदरी रस्त्यात पुनर्वसन व श्रेणीसुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये हिरकणीवाडी कनेक्टर ९५० मीटर आणि जिजामाता समाधी कनेक्टर १२१३ मीटरचा समावेश आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणकडून केबल टाकण्यासाठी साईडपट्टीचे यांत्रिक पद्धतीने खोदकाम सुरू करण्यात आले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad raigad road mahavitaran cable work stopped over permission issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय
1

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन
2

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू;  बुकिंगला जोरदार प्रतिसाद
3

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

Nagpur News : देशातील पहिले दंतचिकित्सा केंद्र नागपुरात
4

Nagpur News : देशातील पहिले दंतचिकित्सा केंद्र नागपुरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.