Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब

एसआयआरपूर्वी २ लाख ४९ हजार ९८६ मतदारांनी आपली गणना पत्रे भरून दिली आहेत. एकूण प्राप्त झालेल्या २ लाख ४९ हजार ९८६ गणना पत्रांपैकी १ लाख ७ हजार ८०० मतदारांनी स्वतःहून 'सेल्फ मॅपिंग' केली असल्याची माहिती ओमासे यांनी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2026 | 02:47 PM
Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब

Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब

Follow Us
Follow Us:
  • महाड मतदारसंघातील २ लाख ९५ हजार ४४९ मतदारांपैकी २ लाख ४९ हजार ९८६ मतदारांनी गणना पत्रे भरून दिली आहेत.
  • तब्बल ४५ हजार ४६३ मतदारांची गणना पत्रे प्राप्त झाली नसून, यापैकी २४ हजार ७४८ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचे आढळले आहे.
  • मतदार यादीत १४९ मयत आणि ५ हजार १२२ दुबार मतदारांची नोंद झाली असून, अंतिम यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
महाड: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाड विधानसभा मतदारसंघातील सखोल मतदार यादी पुनर्नरीक्षण अर्थात ‘एसआयआर’ कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. एसआयआरपूर्वी मतदारसंघात असलेल्या एकूण २ लाख ९५ हजार ४४९ मतदारांपैकी २ लाख ४९ हजार ९८६ मतदारांनी आपली गणना पत्रे भरून दिली असून, तब्बल ४५ हजार ४६३ मतदारांची गणना पत्रे प्राप्त झालेली नाहीत, अशी माहिती महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी दिली आहे.

Mira Bhayandar Fire Brigade: अग्निशमन दलाच्या मदतीला ‘फायर फायटिंग ड्रोन’; उंच इमारतींतील आगीवर नियंत्रणाचा नवा प्रयोग

यासंदर्भात अधिक माहिती देताना ओमासे यांनी सांगितले की, एकूण प्राप्त झालेल्या २ लाख ४९ हजार ९८६ गणना पत्रांपैकी १ लाख ७ हजार ८०० मतदारांनी स्वतःहून ‘सेल्फ मॅपिंग’ केले आहे. ऑफलाइन पद्धतीने २ लाख ४९ हजार ४७ गणना पत्रे प्राप्त झाली असून, त्यापैकी १ लाख २९ हजार ३३२ मतदारांचे मॅपिंग झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने ९३९ गणना पत्रे प्राप्त झाली असून, अद्याप १२ हजार ८५० मतदारांचे मॅपिंग झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

  • एसआयआरपूर्वी एकूण मतदार २ लाख ९५ हजार ४४९
  • गणना पत्रे भरलेले मतदार २ लाख ४९ हजार ९८६
  • गणना पत्रे प्राप्त न झालेले मतदार ४५ हजार ४६३
  • ‘सेल्फ मॅपिंग’ केलेले मतदार १ लाख ७ हजार ८००
  • ऑफलाइन पद्धतीने गणना पत्रे ९३९
  • अद्याप मॅपिंग न झालेले मतदार १२ हजार ८५०
  • मयत मतदार १४९
  • कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार २४ हजार ७४८
  • दुबार मतदार ५ हजार १२२
  • अनुपस्थित मतदार – १ हजार ४३२
  • अन्य कारणामुळे स्वतंत्र नोंद झालेले मतदार १५२
महाड विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने या पुनर्नरीक्षण मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र मतदारांनी आपली नावे, पत्ते व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात. – पोपट ओमासे, प्रांताधिकारी

१४९ मतदार मयत असल्याचे निष्पन्न

दरम्यान, गणना पत्र प्राप्त न झालेल्या ४५ हजार ४६३ मतदारांपैकी १४९ मतदार मयत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वाधिक म्हणजे २४ हजार ७४८ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच ५ हजार १२२ मतदार दुबार असल्याचे आढळून आले असून, १ हजार ४३२ मतदार अनुपस्थित आहेत. अन्य कारणांमुळे १५२ मतदारांची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.

चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत! मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक

असा असेल पुढील कार्यक्रमः

  • प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध -२४ ऑगस्ट २०२६
  • दावे व हरकती दाखलची मुदत -२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६
  • प्राप्त दावे व हरकतीवर निर्णय -२४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६
  • अंतिम मतदार यादी प्रसिद्ध -२७ ऑक्टोबर २०२६

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad voter list sir 45463 enumeration forms missing final electoral roll to be published on october 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
1

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
2

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
3

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!
4

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.