
Raigad News: प्रभागात केलेल्या विकासाकामांमुळेच आम्ही विजयी होऊ; महायुतीच्या उमेदवारांनी केला दावा
Amaravati News: नायलॉन मांजा वापराल तर खबरदार! महानगरपालिका प्रशासनाचा इशारा
यावेळी डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी सांगितलं की, २०१७ ते २०२२ या कालावधीत या प्रभागात अनेक विकासाची कामे केली आहेत. सिडकोकडून भूखंडाचे हस्तांतरण, रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज लाईन, घनकचरा व्यवस्थापन, विविध ठिकाणच्या बगीच्यांमध्ये खेळणी-ओपन जिम, स्वच्छतागृहे, वेंगसरकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाण्याचे व्यवस्थापन आदि कामे या प्रभागात आम्ही करू शकलो. या निवडणुकीकरता पक्षाने आम्हाला पुन्हा संधी दिली आहे, ती आम्ही केलेल्या विकास कामांमुळेच. (फोटो सौजन्य – Pinterest)
संतोष जी. शेट्टी यांनी, प्रभाग १६ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कुठल्याही निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये या प्रभागामधून भाजपला मताधिक्य मिळवून दिलेले आहे. राजश्री महेंद्र वावेकर यांनी, प्रचार करताना जनतेचा, मतदारांचा आम्हाला अतिउत्तम प्रतिसाद आहे. विकासकामे केल्यामुळेच मतदार आमचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत निवडणुकीत आमचा मोठा विजय होईल असे त्यांनी सांगितले. समीर बाळाशेठ ठाकूर यांनी, प्रभागात आम्ही केलेली कामे बोलतात. विरोधकांनी कुठलीही विकास कामे केलेली नाहीत. केलेल्या विकास कामामुळेच या प्रभागात जनतेला, मतदारांना भाजप हाच पक्ष हवा आहे, असे सांगितले.
Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत
या प्रभागात पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण करावे लागले, त्यानंतर ४६० कोटीची निविदा काढण्यात आली. विसर्जन तलाव, वेंगसरकर आंतरराष्ट्रीय क्रीडा अकॅडमी त्याचबरोबर कोरोना काळात केलेली मदत, भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव, गणेश विसर्जन तलावा ठिकाणी गणेश भक्तांचे स्वागत, छटपूजा, बगीचे, रस्ते आदी मोठ्या प्रमाणात विकासकामे या प्रभागात केली आहेत. विरोधक हे फक्त सोशल मीडियावर दिसतात. भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात आम्ही विकासकामे करत असल्याची त्यांनी सांगितले.