Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन; पेव्हर ब्लॉकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

माथेरान शहरातील रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे घोड्यांचे पाय घसरून अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अश्वपालकी यांनी ठिय्या आंदोलन केले.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 23, 2026 | 08:02 PM
माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन

माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • माथेरान शहरात पेव्हर ब्लॉकमुळे घोड्यांचे अपघात
  • माथेरान नगरपरिषद कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने अश्वपालकांचे आंदोलन
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
संतोष पेरणे/ कर्जत: माथेरान शहरात पेव्हर ब्लॉक वरून घोड्यांचे पाय घसरून अपघात होतात,त्याचवेळी उताराच्या ठिकाणी घोड्यांना होणारे अपघात टाळण्यासाठी माथेरान अश्वपाल संघटना यांच्या कडून दाद मागण्यात येत होती. मात्र माथेरान नगरपरिषद कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने आज माथेरान मधील अश्वपालक यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी माथेरान नगरपरिषद यांनी चर्चा करताना एप्रिल महिन्यात संनियंत्रण समितीची बैठक होणार असून त्या बैठकीत अश्र्वपाल यांचा विषय मांडला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण

माथेरान मधील पेव्हर ब्लॉक बाबत अश्वपाल संघटनेचे अध्यक्ष आशा कदम, सचिव विकास रांजणे,माजी अध्यक्ष शैलेश शिंदे तसेच मुलवासी अश्वपाल संघटनेचे पदाधिकारी यांनी आज श्रीराम चौकात ठिय्या आंदोलन केले. सुप्रीम कोर्टाने ई-रिक्षा व क्ले पेव्हर ब्लॉक संदर्भात दिलेला निर्णय यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. त्यात राज्य सरकारला दस्‍तुरी नाका ते शिवाजी महाराज पुतळा या दरम्यानच्या रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक्स (मातीचे पेव्हर ब्लॉक्स) बसवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे ब्लॉक्स बसवताना, त्यांच्या खाली कोणताही काँक्रीटचा थर नसावा. आयआयटी मुंबईने शिफारस केलेल्या इतर उपाय योजनांची अंमलबजावणी करावी. नीरी या संस्थेने दिलेल्या शिफारसींचीही अंमलबजावणी करण्यात यावी. दस्‍तुरी नाका ते शिवाजी महाराज पुतळा या मुख्य रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक्सना परवानगी असली, तरी अंतर्गत रस्त्यांवर आणि कोणत्याही परिस्थितीत ट्रेकिंग मार्गांवर पेव्हर ब्लॉक्स बसवले जाऊ नयेत. या उपाययोजनांमुळे मुख्य रस्त्यावर ई-रिक्षांची हालचाल सुलभ होईल आणि त्याच वेळी अंतर्गत व ट्रेकिंग मार्ग केवळ ट्रेकर्स आणि घोड्यांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी राखीव राहतील याची खात्री होईल, यामुळे हातगाडी ओढणारे आणि घोड्यांवर अवलंबून असणारे लोक यांच्या हक्कांचा समतोल राखला जाईल असे निर्देश आहेत.

Mumbai Pune Missing Link: मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट! मुंबई-पुणे मिसिंग लिंक १ मे रोजी होणार खुला

माथेरान शहरातील हातगाड्या/हात-रिक्षा ओढण्याची प्रथा टप्प्याटप्प्याने आणि कोणत्याही परिस्थितीत आजपासून सहा महिन्यांच्या आत त्वरित बंद करावी. राज्य सरकारने गुजरातच्या केवडिया येथील योजनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक पुनर्वसन योजना तयार करावी. राज्य सरकार किंवा त्यांच्या वतीने नियुक्त प्राधिकरण ई-रिक्षा खरेदी करेल आणि त्या ठराविक भाड्याने अधिकृत रिक्षाचालकांना किंवा आदिवासी महिलांसह इतर गरजू व्यक्तींना उपलब्ध करून देईल. यामध्ये खऱ्या/अधिकृत हात-रिक्षा ओढणाऱ्यांना प्राधान्य दिले जावे.

अधिकृत हात-रिक्षा चालकांच्या ओळखीबाबत रायगड जिल्हा न्यायाधीशांच्या चौकशीत अनेक त्रुटी आढळल्या असल्याने, आम्ही ‘माथेरान मॉनिटरिंग कमिटी’ला (जिल्हाधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली) हे काम सोपवत आहोत. ही समिती जमिनीवरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन ई-रिक्षांची संख्या निश्चित करेल. उर्वरित ई-रिक्षा माथेरानमधील इतर वंचित व्यक्तींना, विशेषतः आदिवासी महिलांना स्वयं पूर्ण होण्यासाठी दिल्या जाव्यात. पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च राज्य सरकारने करावा या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्या घेऊन ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनाची दखल घेऊन माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांनी भेट घेऊन आंदोलक यांच्याशी चर्चा केली. यावेळी एप्रिल महिन्यात होणाऱ्या संनियंत्रण समितीच्या बैठकीत हा विषय मांडण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

Web Title: Matheran horse owners protest demand implementation of supreme court order on paver blocks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Karjat
  • Matheran
  • Raigad News

संबंधित बातम्या

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी
1

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी

Karjat News: कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू
2

Karjat News: कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू
3

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा
4

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.