Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा

New Mumbai : नवी मुंबई विमानतळाने विमानसेवा क्षेत्रातील केटरिंग कंपनी ताजसॅट्ससोबत सुरू असलेली त्यांची इन-फ्लाइट केटरिंग सुविधा वाढवली आहे. या किचनची दररोज 7,500 मील (जेवणाचे डबे) तयार करण्याची क्षमता आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 06, 2026 | 04:11 PM
New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील 'या' सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील 'या' सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा

Follow Us
Follow Us:
  • विमानसेवा क्षेत्रात ताजसॅट्ससोबत करार
  • दिवसाला 7500 जेवणाचे डबे करण्याची क्षमता
  • पायाभूत सुविधांचा वेगाने विकास
 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) (New Mumbai) मंगळवारी सांगितले की, विमानसेवा क्षेत्रातील केटरिंग कंपनी ताजसॅट्ससोबत सुरू असलेली त्यांची इन-फ्लाइट केटरिंग सुविधा हिवाळी 2026-27 वेळापत्रकापूर्वी विमान कंपन्यांच्या वाढत्या सेवांना मदत करण्यासाठी सज्ज आहे. हे वेळापत्रक 25 ऑक्टोबरपासून 27 मार्च 2027 पर्यंत असेल.

विमानतळ परिसरात असलेल्या या फ्लाइट किचनमध्ये सध्या दररोज 40 हून अधिक विमानांसाठी खाद्यपदार्थ तयार केले जातात. या किचनची दररोज 7,500 मील (जेवणाचे डबे) तयार करण्याची क्षमता आहे.

पायाभूत सुविधांचा वेगाने विकास

विमान कंपन्या आणि प्रवाशांची संख्या वाढल्यास या सुविधेची क्षमता वाढवून दररोज 15 हजार मील तयार करता येऊ शकतात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य विमानतळ अधिकारी सुभाष मुरिकेंचरी म्हणाले, NMIAचे विमानसेवा नेटवर्क विस्तारत असताना त्याला पूरक पायाभूत सुविधाही त्याच वेगाने विकसित होणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, ताजसॅट्सचे फ्लाइट किचन विमान कंपन्यांना वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत करते आणि प्रवाशांच्या खाद्यपदार्थांशी संबंधित अनुभवात सुधारणा करते. या सुविधेमध्ये उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, रेफ्रिजरेशन सिस्टिम आणि ऑपरेशनल प्रक्रिया यांचा समावेश आहे. विमान कंपन्यांच्या वेळापत्रकानुसार आणि मागणीत होणाऱ्या बदलांनुसार काम करता यावे, यासाठी या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

विमानतळाजवळच कॅटरिंगचा पर्याय

विमानतळ परिसरातील या किचनच्या स्थानामुळे विमानांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होते. NMIAने सांगितले की, भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना या सुविधेमुळे विमानतळाजवळच आणखी एका केटरिंग पर्यायाचा लाभ मिळतो.

विमानतळाच्या माहितीनुसार, भारतातून उड्डाण करणाऱ्या सुमारे ४० टक्के आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या स्वतःच्या फ्लाइट किचनवरून केटरिंगची व्यवस्था करतात. NMIAची इन-फ्लाइट केटरिंग पायाभूत सुविधा ही गरज पूर्ण करण्यासोबतच देशांतर्गत विमान कंपन्यांच्या केटरिंग गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे.

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?

या सुविधेत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या विमान कंपन्यांना केटरिंग सेवा दिली जाते. विशेष मील, अॅलर्जी लक्षात घेऊन विविध खाद्य पदार्थ तयार केले जातात.

NMIAने सांगितले की, या किचनमध्ये अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेच्या मानकांचे पालन केले जाते. यात हॅझर्ड अॅनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट्स (HACCP), ISO 22000 आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचा समावेश आहे.

ताजसॅट्स गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून विमानसेवा केटरिंग क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही कंपनीचे फ्लाइट किचन कार्यरत आहे.

विमानतळाने सांगितले की, ही सुविधा आधीपासूनच कार्यान्वित असून, भविष्यात विमानसेवा कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांची संख्या वाढल्यास तिची क्षमता आणखी वाढवता येणार आहे.

Web Title: New mumbai expansion of this facility at navi mumbai airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • FSSAI
  • Kitchen
  • navi Mumbai Airport

संबंधित बातम्या

जिरे पूड वापरणाऱ्यांनी सावध व्हा! FSSAIची मोठी कारवाई; ‘या’ बॅचमध्ये MRLपेक्षा जास्त कीटकनाशक अवशेष
1

जिरे पूड वापरणाऱ्यांनी सावध व्हा! FSSAIची मोठी कारवाई; ‘या’ बॅचमध्ये MRLपेक्षा जास्त कीटकनाशक अवशेष

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.
2

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.