Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितीन गडकरींची ‘३१ मे’ची डेडलाईन फेल! मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण; कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ३१ मे ची डेडलाईन अपयशी ठरली आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे ३० टक्के काम अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 04, 2026 | 09:11 PM
नितीन गडकरींची '३१ मे'ची डेडलाईन फेल! मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण (Photo Credit - X)

नितीन गडकरींची '३१ मे'ची डेडलाईन फेल! मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • नितीन गडकरींची ‘३१ मे’ची डेडलाईन फेल!
  • मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण
  • पावसाळ्यापूर्वी कोकणवासियांचा प्रवास धोक्यात
Mumbai-Goa Highway News: मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) रुंदीकरणाबाबत कोकणवासीय आणि प्रवाशांच्या पदरी पुन्हा एकदा तीव्र निराशा आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी दिलेली ३१ मे २०२६ ची अंतिम मुदत (Deadline) पूर्णपणे अपयशी ठरली आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे काम शंभर टक्के पूर्ण केले जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. मात्र, जून महिना सुरू झाला तरी महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक टप्पे अजूनही अपूर्णच आहेत.

१५ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा अन् अपूर्ण पायाभूत सुविधा

या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०११ पासून, म्हणजेच गेल्या १५ वर्षांपासून रखडत सुरू आहे. या प्रदीर्घ कालावधीत अनेक बड्या कंत्राटदार कंपन्या बदलण्यात आल्या परंतु महामार्गाचे भाग्य बदलू शकलेले नाही. सद्यस्थितीचा विचार केला तर, एकट्या रायगड जिल्ह्यातील १४० किलोमीटरच्या टप्प्यांपैकी केवळ ७० टक्के काम पूर्ण होऊ शकले आहे, तर तब्बल ३० टक्के काम अजूनही प्रलंबित आहे.

महामार्गावरील हे मुख्य काम अजूनही रखडलेले

रायगड जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपासचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या दोन्ही बायपास मिळून सुमारे १० किलोमीटरचा मुख्य रस्ता अद्याप तयार व्हायचा आहे. कोलाडनजीकच्या उड्डाणपुलाचे (Flyover) बांधकाम मध्यातच रखडले आहे. याशिवाय, महामार्गालगतच्या गावांना जोडणारे सर्व्हिस रोड आणि अंतर्गत रस्ते अनेक भागांत अजूनही तयार करण्यात आलेले नाहीत. अनेक क्षेत्रांत रस्ता अपूर्ण असल्याने वाहतूक एकेरीमार्गाने वळवण्यात आली आहे. यामुळे या महामार्गावर भीषण रस्ते अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे.

LPG च्या वाढत्या किमतींना नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक! सादर केली स्वस्तातली नवीन टेक्नॉलॉजी

काम अपूर्ण, पण टोल वसुली सुरू; प्रवाशांमध्ये तीव्र संताप

महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) खारपाडा येथे पहिला टोल नाका (Toll Plaza) सुरू केला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या टोल वसुलीला ‘प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली लूट’ म्हणून संबोधले आहे. “जेव्हा रस्ताच पूर्णपणे सुरक्षित आणि तयार नाही, तर मग टोल कोणत्या गोष्टीचा वसूल केला जात आहे?” असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत. स्थानिक स्तरावर या टोल नाक्याला तीव्र विरोध होत असूनही प्रशासनाने टोल वसुली थांबवलेली नाही.

पावसाळ्याच्या तोंडावर कोकणवासियांची चिंता वाढली

आता जून महिना सुरू झाला असून मान्सून अगदी तोंडावर आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि स्थानिक रहिवाशांना पुन्हा एकदा खड्डेमय आणि धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार अशी भीती सतावत आहे. “दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केवळ आश्वासनांची खैरात वाटली जाते, पण प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही सुधारणा दिसत नाही,” असा आरोप कोकणवासियांनी केला आहे. जेव्हा इतके काम बाकी होते, तेव्हा कोणत्या आधारावर ३१ मे ची डेडलाईन जाहीर केली गेली? असा रोकडा सवाल आता सामान्य जनता प्रशासनाला विचारत आहे.

“आम्हा बिहाऱ्यांची काळजी घ्या”; Shekhar Suman यांच्या वक्तव्यावर Nitin Gadkari यांची मिश्कील प्रतिक्रिया चर्चेत

Web Title: Nitin gadkaris may 31 deadline missed mumbai goa highway work remains incomplete this year too

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • kokan
  • Kokan News
  • Mumbai Goa Express Way
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’
1

Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी
2

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ
3

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.