Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : वनविभागाचं दुर्लक्ष , बेकायदा मातीची तस्करी; चिमटेवाडीतील गावकरी आक्रमक

कर्जत तालुक्यात गेली कित्येक महिने बेकायदा मातीची तस्करी केली जात असूनही वनविभागाला मात्र याची काहीच जाग नाही असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2025 | 05:28 PM
Raigad : वनविभागाचं दुर्लक्ष , बेकायदा मातीची तस्करी; चिमटेवाडीतील गावकरी आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे :  तालुक्यातील लाल माती बेकायदेशीररित्या नवी मुंबईमध्ये नेवून पैसे कमावण्याचा धंदा सुरू आहे.या व्यवसायाला चाप लावण्याचे काम कर्जत तहसीलदार यांच्याकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे बसू लागला आहे.मात्र कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य लगतचे जमिनीमधील झाडे झुडपे तोडून लाल मातीची तस्करीचे मुख्य केंद्र नांदगाव ग्रामपंचायत मधील चिमटेवाडी आहे.दरम्यान त्या ठिकाणी तब्बल वर्षभरापासून वन जमिनीमध्ये आणि काही खासगी जमिनीमध्ये लाल माती काढून विक्री केली जात असताना महसूल विभागला यांची माहिती नाही हे मोठे आश्चर्य ठरत आहे.चिमटेवाडी हे गाव कर्जत तालुक्यातील शेवटचे गाव असून या गावाच्या एका बाजूला ठाणे जिल्ह्याची हद्द तर गावाच्या मागे भीमाशंकर अभयारण्य यांची हद्द आहे. कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मध्ये असलेल्या चिमटेवाडी कडे जाणारे रस्ते लाल माती वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे नादुरुस्त झाले आहे.

गेले वर्षभर या चिमटेवाडी मधील लाल मातीची तस्करी सुरू असून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे.बळीवरे गावापासून पुढे मोहोपाडा गावाच्या नंतर चिमटे वाडी हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावाला भीमाशंकर अभयारण्य हद्दी मुळे अनेक बंधने आली आहेत.मात्र तालुक्यातील शेवटचे गाव असल्याने चिमटे वाडी कडे सरकारी अधिकारी फिरकत नसल्याने त्याचा फायदा लाल माती तस्कर यांनी उठवला आहे.रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत लाल माती घेवून जाण्यासाठी येणारे हायवा ट्रक यांची ये जा रात्रभर सुरू असताना बलीवरे मोहोपाडा आणि चिमटे वाडी मधील ग्रामस्थ झोप तरी कशी घेवून शकतात असा प्रश्न पुढे आला आहे.

चिमटेवाडी मधील मातीची तस्करी स्थानिकांच्या मदतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे.तेथील काही तरुण गावातील लोकांना तुमच्या जमिनीचे बिनशेती मध्ये रुपांतर करून देतो असे सांगून त्या जमिनी मधील लाल माती काढून देण्यासाठी मदत करतात. त्याचवेळी या ग्रामपंचायत हद्दी मधील एक पांढऱ्या रंगाचा जेसीबी मशीन तेथील लाल माती काढण्यासाठी मदत करीत आहे.हे सर्व येथील स्थानिक उघड्या डोळ्याने पाहत आहेत त्याचे कारण या भागातील राजकीय वरदहस्त असलेली व्यक्ती कडूनच लाल माती काढून देण्यासाठी लाल मातीच्या तस्करांना मदत करीत आहे.

 

सरकारी अधिकाऱ्यांची पाठ आणि ट्रक गायब…
सरकारी अधिकाऱ्यांनी त्या सर्व गाड्यांचे व्हिडिओ चित्रण केलेले असताना देखील सरकारी अधिकारी गेल्यावर चिमटेवाडी मधून ते ट्रक बाहेर काढणारे स्थानिक असल्याने लाल मातीचा केंद्रबिंदू तब्बल एक वर्षांनी समोर आला आहे.आठ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता कर्जत तहसीलदार यांच्याकडून चिमटे वाडी येथे धाड टाकण्यात आली त्यावेळी त्या गावाच्या बाहेर जंगलात एकाच ठिकाणी सात आणि अन्य ठिकाणी एक असे तब्बल आठ हायवा ट्रक उभे होते.त्या ट्रकचे चालक हे चिमटे वाडी गावांमधील एका नेत्याच्या घरात लपून बसले होते.तर सरकारी अधिकारी निघून गेल्यावर पहाटे पाच वाजता ते सर्व ट्रक चिमटे वाडी मधून सुखरूप बाहेर काढण्याची हिम्मत देखील त्या राजकीय वरदहस्त असलेल्या स्थानिक नेत्यांनी केली.

भीमाशंकर अभयारण्य भागात जावून खोदकाम…
लाल मातीचा हॉटस्पॉट बनलेल्या चिमटे वाडी मधील त्या दहा एकरातील जमिनीबद्दल महसूल खात्याला थांगपत्ता नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. दुसरीकडे चिमटे वाडी गावाला लागून वन विभाग यांचे संरक्षित क्षेत्र असून भीमाशंकर अभियारण्य देखील लागून आहे.असे असताना या संरक्षित जमिनीमधील लाल माती गेल्या एका वर्षापासून काढण्याची हिम्मत नांदगाव ग्रामपंचायत मधील पुढारी करीत असल्याने प्रशासन सुप्त असल्याचे दिसून येत आहे.मात्र कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांच्याकडून स्वतः त्या जागेवर धाड टाकण्यात आल्यावर महसूल प्रशासन कामाला लागले आहेत असे दिसून येत आहे.

वन जमिनीचा देखील वापर..
नांदगाव, खांडस,ओलमन आणि पाथरज ग्रामपंचायती मधील लाल मातीची तस्करी होत असताना कधीही त्या भागात न फिरकणारे महसूल विभागाचे तलाठी जंगलात फिरून माती आणि गौण खनिज उत्खनन कुठे केले आहे याची मोजमापे घेवू लागले आहेत.मात्र त्यात अनेक तलाठी यांना मोजमापे घेताना मोठ्या अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.माती उत्खनन करताना अनेक ठिकाणी जमिनीचे मालक यांचा थांगपत्ता नाही तर काही ठिकाणी वन जमिनीचा वापर लाल माती काढण्यासाठी केला आहे.

यात सर्वात महत्वाचे म्हणजे गेली वर्षभर काढली जाणारी लाल माती ही शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल भरून स्वामित्व शुल्क भरून काढण्यात आलेली आहे हे सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर कर्जत तालुक्यातील लाल मातीची तस्करी सुरू असल्याचे चर्चा सुरू असताना आपल्यापैकी एकाही तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडून दंडात्मक कारवाई होऊ शकली नाही.ज्या ठिकाणी की रात्रीच्या वेळी जावून कारवाई करू शकलो त्या ठिकाणी तुम्ही दिवसा देखील जात नाही आणि दंडात्मक कारवाई करीत नाहीत याचे आश्चर्य वाटत असल्याची खुली तक्रार तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या बैठकीत केली.तुम्ही दिवसा जावून तालुक्यातील प्रत्येक ठिकाणचे अपडेट गोळा करून आठ दिवसात सर्व ठिकाणचे पंचनामे पूर्ण करून कारवाई करावी असे आदेश तहसीलदार यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Web Title: Raigad forest departments negligence illegal soil smuggling villagers in chimtewadi are aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Karjat
  • raigad

संबंधित बातम्या

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
1

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
2

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट
3

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात
4

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.