Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभाग अलर्ट; मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि जलजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 03:44 PM
Raigad News: पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभाग अलर्ट; मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

Raigad News: पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभाग अलर्ट; मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

Follow Us
Follow Us:
  • मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि लेप्टोस्पायरोसिससारख्या साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने विशेष तयारी केली आहे.
  • जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधसाठा, तपासणी साहित्य आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  • पूरबाधित भागांतील गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून आवश्यकतेनुसार त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाणार आहे.
अलिबाग: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पावसाळ्यात पसरणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, अतिसार, गॅस्ट्रो, टायफॉईड व लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क असून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

Raigad News: पाऊस लांबल्याने भाज्या महागल्या! पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक घटली

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा, तपासणी साहित्य व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच संशयित रुग्णांचे त्वरित निदान व उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्यात आले असून नियमित पाणी नमुना तपासणी, क्लोरीनेशन आणि जलस्रोतांची स्वच्छता केली जात आहे. पूरस्थिती किंवा अतिवृष्टीच्या काळात तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. गंभीर आजारी, दिव्यांग व्यक्ती आणि दुर्धर मुले यांचीही यादी अद्ययावत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी नागरिकांना ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

अनेक पूरबाधित गावांमध्ये गर्भवतींसाठी विशेष सुविधा

पूरबाधित गावांमध्ये प्रसुतीची तारीख जवळ आलेल्या गर्भवती मातांना ८ दिवस आधीच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून घेतले जाईल, तसेच त्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाणार आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी टाळणे, उकळून पाणी पिणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल

विविध उपाययोजनांची अमलबजावणीची माहिती

पावसाळ्यात डासांची उत्पती रोखण्यासाठी गावपातळीवर स्वच्छता मोहीम, साचलेल्या पाण्यावे निर्मूलन, घरभेटी व जनजागृती करण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून नागरिकांना रोगप्रतिबंधक उपायांची माहिती दिली जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Raigad health department on high alert to combat monsoon diseases medical teams and facilities ready

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Health Department
  • Heavy Rain
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: पाऊस लांबल्याने भाज्या महागल्या! पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक घटली
1

Raigad News: पाऊस लांबल्याने भाज्या महागल्या! पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक घटली

Raigad News: शाळा प्रवेशावर संकट! जन्म दाखले न मिळाल्याने बालकांचे शिक्षण धोक्यात; जिल्हा परिषद आरोग्य विभागावर अनास्थेचा आरोप
2

Raigad News: शाळा प्रवेशावर संकट! जन्म दाखले न मिळाल्याने बालकांचे शिक्षण धोक्यात; जिल्हा परिषद आरोग्य विभागावर अनास्थेचा आरोप

Mahad : स्थानिक भूमिपुत्रांसाठी मनसे आक्रमक, रोजगार, किमान वेतन आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर आंदोलन
3

Mahad : स्थानिक भूमिपुत्रांसाठी मनसे आक्रमक, रोजगार, किमान वेतन आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर आंदोलन

Maharashtra Rain Alert: आता ये रे बाबा! राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम; मान्सूनची स्थिती काय?
4

Maharashtra Rain Alert: आता ये रे बाबा! राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम; मान्सूनची स्थिती काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.