
Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह
माथेरानमध्ये ब्रिटिशांनी शार्लोट लेकची निर्मिती केली. पूर्वी या तलावातील गाळ दरवर्षी मजुरांकडून माथेरान नगरपरिषद करीत होती. २०१३ मध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून काढण्यात आल्यानंतर पुढे २०२६ ऑगस्ट महिन्यापर्यंत गाळ कायम होता. गाळाने लेक भरला असल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत २.० मधून ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. (फोटो सौजन्य – AI Created)
२०२३ पासून ते काम प्रलंबित असून अद्याप शार्लोट लेक गाळमुक्त झाला नाही आणि संवर्धनाचे काम अद्याप नाही. मात्र शार्लोट लेकच्या संवर्धनासाठीचा निधी लाटण्यासाठी अनेक प्रकार सुरु आहेत. मनुष्यबळाने लेकमधील गाळ काढून तो शहरातील रस्त्यांसाठी वापरला जाणार होता. साधारण १००० ट्रक गाळ काढल्याचा अहवाल तत्कालीन नगर अभियंता इंजिनियर यांच्याकडून नोंदवून पालिकेकडे बिल अदा करण्यासाठी पाठवला होता. हे देयक पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे चर्चेला आल्यावर गाळ काढण्याच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे ते देयक अदा केलेले नाही.
तत्कालीन पालिकेच्या सभेत प्रश्न उपस्थित झाल्यावर नगर अभियंतांकडून थातुरमाथुर उत्तरे दिली. काही दिवसांनी बदली घेऊन माथेरानमधून बाहेरच्या नगरपरिषदेत जाणाऱ्या तत्कालीन नगर अभियंतांच्या चौकशीची मागणी आली. कारवाईच्या भीतीने नगरपरिषदमधून इंजिनियर बदली करून जात असेल तर नक्की हा प्रकार संशयास्पद असून या प्रकरणाची नगरविकास विभागाने चौकशी करावी. -राकेश कोकळे, स्थानिक कार्यकर्ते
दरम्यान शार्लोट लेक सध्या पाण्याने 66 भरला आहे. त्यामुळे माथेरान पालिकेने गाळ आहे किंवा नाही हे जाहीर करावे. गाळ वाहून जाण्यासाठी १० ऑगस्टला पाणी सोडले. पाण्यासोबत गाळ वाहून गेला नाही, हा प्रकार दहा दिवस सुरु असताना पाणी टंचाई झाली, त्यानंतर लेक मधील पाणी पुन्हा अडवले, आज शार्लोट लेक गाळमुक्त झाला का? तलावाचे संवर्धन झाले का? गाळ काढण्याची कामे संपली का?- मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष