कर्जत /संतोष पेरणे: राज्यात सर्वत्र तापमान चाळिशी पार गेले आहेत आणि थंड हवेचे राज्य असलेले काश्मीर मध्ये देखील तापमान ३० पेक्षा अधिक दिसून येतात.मात्र माथ्यावरील रान असलेल्या माथेरानमध्ये रात्रीच्या वेळी चांगला गारवा जाणवत आहे.साधारण २० डिग्री सेल्सिअस माथेरानमध्ये येथील वाढलेले जंगल यामुळे पर्यटन वाढीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. मुंबई महानगरापासून सर्वात जवळअसलेलं ठिकाण म्हणजे माथेरान.
थंड हवेचे आणि गुलाबीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान हे थंड हवेचे सध्याच्या उन्हाळ्यात पर्यटकांना आकर्षित करू शकते.राज्यात उन्हाने अंगाची लाहीलाही होत असून पारा चाळिशी पार गेला आहे.जगातील नंदनवन समजले जाणाऱ्या काश्मीर मध्ये देखील तापमान ३२ अंशांवर पोहचला आहे.दक्षिण भारतात तर पारा आणखी वर गेला असून प्रत्येकाला थंड हवेची झुळूक हवी आहे.त्यात गुलाबी थंडी साठी ओळखल्या जाणाऱ्या माथेरान मध्ये सध्या पारा हिवाळ्यात असल्यासारखा खाली घसरला आहे.
जंगलाने व्यापून टाकलेल्या माथेरान मध्ये पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील प्रवेश बनल्याने झाडे तोडीवर बंदी आहे.त्यामुळे निसर्ग संपदा अनाई वनराई आणखी मजबूत झाली असून माथेरान मधील गारवा वाढण्यास मदत होत आहे.हिवाळ्यात मागील वर्षी पारा नीचांकी पातळीवर खाली आला होता,त्यावेळी चक्क ७.०अंश पर्यंत पारा घसरला होता.उत्तरेत तापमान वाढले असून देशात उष्णता वाढली आहे.त्यामुळे अंगाची लाहीलाही करणारा ऊन माथेरान मधील निसर्ग यामुळे उकाडा वाढला आहे.
माथेरान हे 2636 फूट उंचावर असलेले ब्रिटिशांनी शोधून काढलेले पर्यटन स्थळ असून हे ठिकाणी मुंबई- पुण्यापासून जवळचे पर्यटनस्थळ आहे.घनदाट झाडी आणि जंगलाने व्यपालेले हे हे पर्यटनस्थळ अधिकच खुलून दिसते.त्यात आजूबाजूच्या शहरात राज्यात कडक उन्हामुळे घामाच्या धारांनी सर्व व्याकूळ झाले आहेत.त्यावेळी माथेरान सारख्या मुंबई पासून सर्वात जवळ असलेल्या ठिकाणी उन्हाळयात एप्रिल महिन्यात दुसऱ्या टप्प्यात माथेरान मध्ये रात्रीच्या वेळी चांगलाच गारवा जाणवत आहे.
रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीत माथेरान नगरपरिषदेच्या तापमान नोंद होत असलेल्या ठिकाणी पारा हा २० अंश एवढा खाली आला आहे.ही बाब माथेरानचे पर्यटन वाढीसाठी आणि माथेरान मधील उन्हाळी पर्यटन हंगामासाठी आशादायी बाब ठरत आहे.११ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यंत माथेरान मध्ये रात्रीच्या वेळी पारा हा २० अंशाचे आसपास राहिला तर दिवसा हा पारा हा ३०-३२ अंशावर राहत आहे.माथेरान मधील निसर्ग झाडे यामुळे येथील गारवा वाढण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे.सध्याची गुलाबी थंडीचा अनुभव घेतला आणि पारा आणखी खाली येईल अशी शक्यता असल्याने पर्यटक माथेरानला येत आहेत.