Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : आता पाळीव प्राणी सहज ओळखता येणार! गोहत्या प्रकरणानंतर कर्जत ग्रामस्थांचा काय आहे महत्त्वाचा निर्णय?

गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन नेरळ पोलिसांना दिले आहे.मुस्लिम धर्मीय समाजातील तरुणांनी गोहत्या रोखण्यासाठी घेतलेली सामंजस्याची भूमिका याचे कौतुक पोलीस उप अधीक्षक यांच्याकडून केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 13, 2025 | 06:48 PM
Raigad News : आता पाळीव प्राणी सहज ओळखता येणार! गोहत्या प्रकरणानंतर कर्जत ग्रामस्थांचा काय आहे महत्त्वाचा निर्णय?
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ पोलीस ठाणे हद्दिमधील दामत या मुस्लिम बहुल गावात गोहत्या होत असल्याच्या तक्रारी येत असतात. काही दिवसांपूर्वी काही गोरक्षक मुस्लिम लोकवस्तीच्या दामत गावात गेले असता पोलिसांसमोर हिंदू तरुणांना शिवीगाळ आणि धमकी देणारे प्रकार घडल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि दोन्ही समाजात निर्माण झालेले तेढ कमी करण्याचे प्रयत्न केले.त्या सर्व प्रयत्नांना यश आले असून पोलिसांच्या भूमिकेमुळे नेरळ जवळील दामत गावातील मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांनी आपल्या गावातील गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन नेरळ पोलिसांना दिले आहे.मुस्लिम धर्मीय समाजातील तरुणांनी गोहत्या रोखण्यासाठी घेतलेली सामंजस्याची भूमिका याचे कौतुक पोलीस उप अधीक्षक यांच्याकडून केले आहे.

गेली काही दिवसापासून नेरळ परिसरामध्ये हिंदू मुस्लिम या दोन धर्मामध्ये तणावाचे वातावरण आहे. दामत मध्ये गोहत्या होत असल्याचा आरोप – व्हिडिओ- सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे काही दिवसापासून नेरल परिसरामध्ये वातावरण पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस उप अधीक्षक डी डी टेले यांनी दामत गावात तेथील मुस्लिम धर्मीय लोकांची बैठक घेतली.गोहत्या बंदीचा कायदा असल्याने खुलेआम होत असलेली कत्तल रोखणे हे सर्वंचे कर्तव्य असल्याने मुस्लिम समाजाने देशाचे कायदे समजून घेतले पाहिजेत असे सूचित केले.त्यानंतर पोलिसांनी काही हिंदू धर्मीय नेत्यांशी चर्चा केली आणि व्हायरल व्हिडीओ वरून निर्माण झालेले वादळ शमविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आज १३ मे रोजी पुन्हा दामत गावातील ग्रामस्थ यांच्या सोबत पोलीस उपअधीक्षक यांनी बैठक घेतली.त्यावेळी दामत गावातीलअजी सरपंच असगर खोत,तसेच सर्फराज टिवाले, मुजहिद खोत, जकी नजे यांच्यासह अनेक मान्यवर मुस्लिम धर्मीय यांच्यासोबत चर्चा केली.त्यावेळी मुस्लिम धर्मीय यांनी नेरळ पोलीस स्टेशन येथे येऊन आम्ही गो-हत्या होऊन देणार नाही तसेच कोणी करत असेल तर आम्ही स्वतः कारवाई करू. तसंच करण्यासाठी आमच्याकडे असलेली घरगुती पाळीव जनावरे त्यांना देखील टॅग मारून ठेवावेत अशी सूचना करणार आहोत.त्याबाबतचे पत्र देखील आम्ही लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना देणार असल्याचे दामत मधील नागरिकांनी यावेळी सांगितले. यापुढे अशी कोणतीही घटना घडली तर आम्ही पहिले सर्वजण मिळून संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले जाईल असे स्पष्ट केले.

डी.डी.टेळे – पोलीस उपनिरीक्षक कर्जत अकरा तारखेला पहाटे 5 च्या सुमारास जे काय घडलं त्या संदर्भात आज दामत गावातील रहिवासी यांनी ठराव करून गावामध्ये अशी कोणतीही घटना घडणार नाही त्या संदर्भात त्यांनी एक कमिटी तयार केली आहे त्याची माहिती आज आम्हाला पोलीस स्टेशन येथे येऊन दिली आहे तसेच दामाद गावामध्ये जे गायी आहेत बैल आहेत त्यांना आम्ही टॅगिंग करण्यासाठी पत्र देणार आहोत.

 

Web Title: Raigad news now pets can be easily identified what is the important decision of karjat villagers after the cow slaughter case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • cow news
  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
1

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश
2

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर
3

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
4

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.