कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत आणि खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेस सुधाकर घारे आणि कार्यकर्त्यांनी हलली नाही. त्यामुळे आगामी काळात कर्जत मध्ये पुन्हा येईल त्यावेळी सुधाकर घारे यांचे पुनर्वसन झालेले असेल आणि त्या आनंदात सहभागी व्हायला येईल असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीरपणे दिले.कर्जत येथे पक्ष प्रवेश आणि कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सुनील तटकरे बोलत होते.
कर्जत येथील सीबीसी लॉन येथील मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी रायगडचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष सुनील तटकरे,राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ,इगतपुरीत आमदार हिरामण खोसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे,प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, भरत भगत,दत्तात्रय मसूरकर, तसेच भगवान भोईर,जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे,अजय सावंत,तसेच खालापूर तालुका संतोष बैलमारे महिला जिल्हा अध्यक्ष उमा मुंढे आदी प्रमुख तसेच कर्जत आणि खालापूर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरुवातीला कर्जत नवीन उपनगर स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील रेल्वे स्थानक नाव देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आले.तर रेल्वे समस्या सोडविण्यात पुढाकार घेणारे पंकज ओसवाल यांच्या माध्यमातून कर्जत येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यात याव्यात यासाठी निवेदन दिले.तर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोक भोपतराव, भरत भगत,यांनी आपली मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना सुधाकर घारे यांना दुर्दैवाने अपघाताने पराभूत व्हावे लागले पण जिद्दीने पुढे आलेले नेते म्हणून तुम्ही आपली ओळख निर्माण केली आहे.शेकाप कार्यकर्त्यांना विश्वास असल्याने तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.सहा महिन्यात राज्यात फेरबदल झाले पण कर्जत मध्ये कार्यकर्ते हलले नाहीत.सुधाकर घारे आणि माझी स्थिती सारखी असून मी देखील एक निवडणूक हरलो आहे.मी मागे पाहिले नाही आणि तुम्ही देखील मागे पाहणार नाही याची खात्री असून सुधाकर घारे तुम्ही देखील पुढेच जाणार असा विश्वास व्यक्त केला.दूरदृष्टी कशी असते ते सुधाकर घारे यांनी दाखवून दिले आहे आणि त्यामुळे तुम्ही केलेली मागणी माझ्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या पर्यंत नेवून कर्जत उपनगर रेल्वे स्थानकाला हुतात्मा वीर हिराजी पाटील स्टेशन असे ओळखले जाईल असे आश्वासन दिले.
कर्जत तालुका देशात पर्यटन बाबतीत आघाडीवर आहे आणि त्यासाठी शासन स्तरावर श्रीवर्धन पेक्ष कानकभर सरस निधी कर्जत मतदारसंघात पाठवले जाईल असे आश्वासन दिले.कर्जत मतदारसंघात अनेक महिन्यांनी आलो आहे आणि त्यामुळे मधल्या काळाची भरपाई केली शिवाय राहणार नाही असे आश्वासन देखील सुनील तटकरे यांनी दिले.कार्यकर्त्यांची कदर करणारा आपला पक्ष असल्याने नरहरी झिरवळ आपण परदेशी जाण्याचे टाळले आणि कर्जत येथे आलात.अनेक महिन्यांच्या चिंतनातून या ठिकाणी आलो असून सर्व एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांच्या सभेच्या सारखी आजची ही सभा आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तीच आहे असे यावेळी विश्वास व्यक्त केला. कर्जत येथील कार्यालय याबाबत हे राज्यातील सर्वात मोठे कार्यालय असून अजित पवार हे जाहीरपणे सांगतात आणि त्यामुळे आता त्याच कार्यालयातून जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे आणि तुमच्या कार्याची जाण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावे असे यावेळी सुनील तटकरे यांनी जाहीर केले.
राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आजचा कार्यक्रम बहुगुणी वाटत असून अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणे ही अभिमानाची बाब आहे. राजकारणात प्रवेश कोणीही सहज करीत नाहीत आणि त्यामुळे मी आदिवासी असल्याने आदिवासी विकास खात्याचा मंत्री होईल असे वाटायचे.मात्र मी २८८ आमदारांचे सभागृह चालवले असल्याने राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देखील काम करील असे सहज म्हटलं होत.मात्र आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही खात्याचा मंत्री व्हायला तयार आहे असे कार्यकर्ते तयार केले आहेत.सुधाकर घारे तुम्ही सरकार मधील सत्ताधारी पक्षात आला आहात आणि तुम्हीं निश्चिंत रहा असा सल्ला दिला.आदिवासी सांस्कृतिक भवन मध्ये येत्या बुधवारी मंत्रालय स्तरावर बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन होणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आपले हे दुसरे पर्व असून २०२५ मधील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामावून घेतले आहे.सुनील तटकरे यांची गाडी कर्जत खालापूर मध्ये फिरली असती आणि खोपोली मध्ये मसुरकर यांच्या घरापर्यंत पोहचली असती तर कर्जत विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार आमदार झाले असते.या मतदारसंघात एका अपक्षाला ९० हजार मते मिळाली असून मुंबई उच्च न्यायालयात माझे पीटिशन दाखल आहे.त्यामुळे त्याचे मनात धाकधूक कायम राहणार हे त्यांनी लक्षात ठेवावे असे सूचित केले.पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी कार्यालयात आलो आणि पूर्वीसारखे काम सुरू केले आहेत.सुनील तटकरे यांना विरोध करणारी माणसे राजकारणातून हद्दपार झाली असून कर्जत येथे देखील आगामी काळात हे पाहायला मिळेल असा टोला विद्यमान आमदार यांना लगावला.कर्जत तालुक्यातील आदिवासी भवन आगामी काळात राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या नेत्यांचे माध्यमातून केले जाईल असे आश्वासन दिले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे,कर्जत पंचायत समितीचे माजी उप सभापती जयवंती हिंदोळा,कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र झांजे,युवक चे तालुका अध्यक्ष महेश म्हसे,अनुसूचित जमाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बबन भालेराव,आदिवासी विकास विभाग पेण प्रकल्प माजी अध्यक्ष दत्ता सुपे,गजानन देशमुख,तसेच शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.याच कार्यक्रमात पळसदरीचे माजी सरपंच शिवसेना कार्यकर्ते युवासेना जिल्हा अध्यक्ष जयेंद्र देशमुख, मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणुक, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदीसह शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.