Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीरित्या राबवून जिल्हा राज्यात अभियानात अग्रेसर राहील, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2025 | 06:34 PM
कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास

कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : गाव समृद्ध झाले तरच राज्याचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीरित्या राबवून जिल्हा राज्यात अभियानात अग्रेसर राहील, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. याच दरम्यान राज्य सरकारच्या महत्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला कर्जत तालुक्यात शुभारंभ झाला आहे. या अभियान कर्जत तालुक्यात यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्य सुरू झाले असून जिल्ह्यात क्रमांक एक वर कर्जत पंचायत समिती राहील असा विश्वास गटविकास अधिकारी आणि प्रशासक सुशांत पाटील यांनी व्यक्त केला.

मिरा-भाईंदर प्रवास कोंडीमुक्त होणार! दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर, काय आहे नवीन ठिकाण?

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा कर्जत पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी गटविकास अधिकारी सुशांत पाटील तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून प्रतिनिधी म्हणून प्रसाद थोरवे यांच्यासह अभियानाची माहिती देण्यासाठी विशेष प्रतिनिधी उपस्थित होते.उप मुख्य कार्यकरी अधिकारी जालिंदर पाठारे,पाणी पुरवठा उप अभियंता अनिल मेटकरी,तालुका पशुधन विकास अधिकारी सचिन भोसले,तालुका गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे, पर्याविक्षाधिनवेक्ष गट विकास अधिकारी मितेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यात १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून, सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रसाद थोरवे यांनी केले.सुरुवातीला या अभियानाची माहिती ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले यांनी दिली.

गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सात घटकांवर आधारित आहे. तालुक्यातील सर्व 55 ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य आहे. गाव अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच जलसमृद्ध गाव करणे हा प्रमुख दृष्टिकोन आहे. राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे, ग्रामस्वच्छता, सुंदर शाळा उभारणी, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सौर ऊर्जेचा वापर, महिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जावा.असेही गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सांगितले.

कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरणावर कारवाईचा बडगा; सरपंचसह ग्रामसेवकावर चोरीचा गुन्हा

Web Title: The chief minister will successfully implement the prosperous panchayat raj campaign in karjat taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Karjat

संबंधित बातम्या

कर्जतमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन, सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी
1

कर्जतमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन, सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय
2

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय

Devendra Fadnavis: “व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखून विकसित महाराष्ट्राचे…” CM फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखून विकसित महाराष्ट्राचे…” CM फडणवीसांचे प्रतिपादन

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
4

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.