Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : तलावातील पाणीसाठ्याचे तीन तेरा; गाळ काढला नाही,संरक्षण कठडा कमी ठेवला, ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर गावकरी आक्रमक

पाणी साठ्यासाठी तलावातील गाळ काढणं अपेक्षित आहे मात्र तसं काहीच झालेलं नाही. दगड टाकून काँक्रीटचा खर्च वाचवण्यासाठी निकृष्टदर्जाचे काम सुरू आहे, अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2025 | 02:15 PM
Raigad : तलावातील पाणीसाठ्याचे तीन तेरा; गाळ काढला नाही,संरक्षण कठडा कमी ठेवला, ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर गावकरी आक्रमक

Raigad : तलावातील पाणीसाठ्याचे तीन तेरा; गाळ काढला नाही,संरक्षण कठडा कमी ठेवला, ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर गावकरी आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

रायगड/  प्रवीण जाधव :  खालापुरातील  परखंदे गावातील तलावासाठी एक कोटी साठ लाख रुपये खर्च करून तलावाचे नव्याने काम सुरू केले. मात्र तलावात पाणी साठा वाढविण्यासाठी गाळ काढणं महत्त्वाचं आहे जो  काढला नाही,संरक्षण कठडा कमी ठेवला असून निकृष्टदर्जाचे काम सुरू आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.  गावातील ग्रामस्थांनी आक्रामक पवित्रा घेत ठेकेदाराला जाब विचारत काम बंद केले आहे. सदर काम पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ठेकेदारावर कारवाई होणार की नाही असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

जिकडे तिकडे खोदकाम अन् राडारोडा; विकास कामाचा प्रवाशांना मोठा फटका, बेस्ट बसचे 97 मार्ग बदलले

राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत विभागाच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांनी परखंदे तलावासाठी एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तलावात पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढला नाही,संरक्षण कठडा कमी ठेवला असून दगड टाकून काँक्रीटचा खर्च वाचवण्यासाठी निकृष्टदर्जाचे काम सुरू आहे, अशी तक्रार गावकऱ्यांनी मांडली आहे. ठेकेदारांचा हलगर्जीपणा  लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रित येत ठेकेदाराला जाब विचारला. या सगळ्या प्रकरणानंतर ठेकेदाराने उडावाउडवीची उत्तरे दिली. संतप्त ग्रामस्थांनी काम बंद केले आहे. सदर काम पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ठेकेदार बदलून चांगल्या ठेकेदाराला काम देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Marathwada Water News: “मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पातून….”; पाणी प्रश्नावर काय म्हणाले गुलाबराव पाटील?

तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने गाळ काढून तलावाची खोली वाढविणे गरजे आहे,तलावाचा संरक्षण कठडा सहा इंचही खोल नाही अशा पध्दतीने कोट्यावधीची निधी उपलब्ध असतानाही निकृष्टदर्जाचा काम सुरू आहे . याबाबत इंजिनियर आणि ठेकेदाराला वेळोवेळी तक्रार करूनही ग्रामस्थांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसल्यामुळेच संतप्त गावकऱ्यांनी तलावाचे काम बंद केले आहे. असं ग्रामपंचायत सदस्य अंकुश मोरे यांनी सांगितलं आहे.तलावाचे काम निकृष्टदर्जाचे सुरू असल्याचे सांगूनही ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे चुकीचं काम केल्यास ग्रामस्थ ऐकणार नाहीत. पर्यावरण आणि तलाव संवर्धनासाठी शासनाने निधी दिलाय आहे.यामाध्यमातून तलावातील गाळ काढून तलावाची खोली वाढविली तर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठेल याचा फायदा गावातील जनावरांना होईल आणि गावातील पाणी टंचाई दूर यासाठी तलावाचे काम चांगले होणे गरजेचे आहे परंतु संबंधित ठेकेदार निकृष्टदर्जाचे काम करीत असल्याने ग्रामस्थ आक्रामक झाले आहेत.

Web Title: Raigad three thirteenths of the water in the lake silt not removed protection level kept low villagers aggressive over contractors negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • Khalapur
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष
1

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
2

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट
3

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात
4

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.