मुंबईमध्ये रस्त्याचे खोदकाम आणि मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे बेस्ट बसचे वेळापत्रक कोलमडले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : शहरातील अंतर्गत वाहतूकीवर सध्या मोठा प्रमाणात परिणाम होत आहे. रस्त्यांचे सुरु असलेले काम आणि बसचे मार्ग यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यातच शहर आणि उपनगरांत सध्या सुरु असलेल्या विविध कामांचा बेस्टच्या वाहतूकीचा चांगलाच फटका बसला आहे. शहरात सुमारे 35 टक्के रस्त्यांचे एकाच वेळी काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. तसेच मेट्रो, पुलांची पुर्नबांधणी, नाल्यांवरील पुलांची बांधणी अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांमुळे बेस्टच्या 23 डेपोतून सुटणाऱ्या सुमारे 97 बस मार्गावरील जवळपास 189 बस वळवल्या आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील प्रवाशांची गैरसोय होत असून बेस्टच्या, महसुलावरही परिणाम होत आहे.
बेस्ट बस ही मुंबईकरांची ‘सेकण्ड लाईफलाईन’ आहे. किफायतशीर आणि स्वस्त तिकिट दरामुळे बसने प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्य देतात. सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ 2 हजार 800 बस आहेत. त्याद्वारे सुमारे 32 लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. बसची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने प्रवाशांना बसकरिता किमान 45 मिनिटे वाट पहावी लागत आहे. त्यातच शहरात बहुतेक सर्वच ठिकाणी विविध कामे सुरु आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गेल्या पाच ते सहा वर्षापासून मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. त्यामुळे तेथील बस थांबेही बंद ठेवले आहेत. दुसरीकडे पालिकेने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतल्याने बेस्टला मार्ग वळवावे लागले आहेत. सुमारे ९७ बस मार्गावरील जवळपास १८९ बस वळवण्यात आल्या आहे.
मुंबई महापालिकेतर्फे संपूर्ण मुंबईतील तब्बल ३५ टक्के रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे एकाच वेळी हाती घेण्यात आली आहे. मेट्रोची कामे सुरु आहेत. यामुळे मुंबईकरांना रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे वाहन चालकांना वाहतुक कोडींचा सामना करावा लागत आहे. त्याचा फटका बेस्टला देखील बसला आहे. रस्त्यांचे काम सुरु असल्याने बस पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक प्रवाशांना जादा पैसे मोजूना रिक्शा-टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. तर प्रवास वेळेत देखील वाढ होत आहे. शहरात ३७ हून अधिक रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे अंदाजे पाच महिने चालणार चालणार: आहेत. त्यामुळे तेथील बेस्टचे बसमार्ग अन्य ठिकाणाहून वळवावे लागले आहेत. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बेस्टच्या बसची घटलेली संख्या आणि प्रवाशांना थांब्यावर बसकरिता पहावी लागणारी प्रतिक्षा वेळ वाढल्याने बेस्टने नवी शक्कल लढविली आहे. शहरातील अल्प प्रतिसाद असलेले बस मार्ग बंद करून त्यामार्गावरील बस जास्त गर्दीच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे अल्प प्रतिसादाच्या मार्गांचा अभ्यास केला जात असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील असे सुमारे २० पेक्षा जास्त मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. बसची कमी होणारी संख्या लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने बसमार्गाचा अभ्यास सुरुवात केला असून अल्प प्रतिसाद मिळत असलेले मार्ग बंद करून त्या मार्गावरील बस गर्दीच्या मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. प्रवासी संख्या कमी असलेले २० पेक्षा जास्त मार्ग बंद करण्याचा विचार सुरू असून सध्या त्याचा अभ्यास सुरू आहे. तर एक ते दोन तासांचा अंतरावर प्रवास करणारे प्रवासीही अल्पच असून हे मार्गही बंद करण्याचा विचार आहे.