
Raigad News: माथेरानघाट रस्त्याची चाळण! खड्ड्यांतूनच वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास, निकष्ट कामामुळे नागरिक त्रस्त
मागील एक दीड महिना या खड्डेमय घाट रस्त्यामुळे वाहनचालक नाराज आहेत. त्यामुळे ऐन पर्यटन हंगाम आला असताना डांबर टाकून खड्डे भरण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून सुरू करण्यात आली. त्यात रात्रीच्या वेळी डांबर टाकून खड्डे भरले जात असताना सकाळी आपली वाहने घेऊन जाणारे वाहनचालक यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत होते. रात्री डांबर टाकून खड्डे भरले जात असल्याने शेवटी ते डांबर रस्त्यावर चिकटले नाही आणि परिणामी डांबर तसेच खडी वाहनांच्या चालण्यामुळे इतरास्त्र पसरत होती. त्यात नव्याने घाट रस्त्यात दुचाकी चालवणारे वाहन चालक यांच्या गाड्या रस्त्यावर कोसळत आहेत. त्यात समोरून वाहने येत असताना दुचाकी कोसळून मोठे अपघात टळले आहेत. पण अनेक वाहने रस्त्यावर पडत होती आणि दुचाकी चालक यांच्या हातापायातून रक्त येत होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्त्यात खड्डे भरण्याची कामे करताना नित्कृष्ट दर्जाचे डांबर वापरले जात असल्याचा आरोप वाहनचालक यांनी केला आहे. माथेरान येथे येणारे पर्यटक ज्या प्रवासी वाहनाने नेरळ येथून माथेरान जात असतात त्या नेरळ माथेरान टॅक्सी संघटना यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्री कुठेही डांबरीकरण केले जात नाही आणि त्यावेळी आवश्यक असलेले तापमान मिळत नसल्याने रस्त्यावर टाकलेले डांबर निघून जाते. त्यानंतर रस्ता आहे तसाच होत असल्याने टॅक्सी चालक यांनी बांधकाम खात्याच्या कारभारावर टीका केली.
घाट रस्ता नादुरुस्त झाल्याने केवळ खड्डे भरून काहीही होणार नाही तर रस्त्यावर अखंडपणे रस्ता नव्याने डोचरीकरण केला पाहिजे. रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून भरल्यानंतर अपघात होत आहेत हे अपघात कोणाच्या जीवावर बेतू नये अशी प्रार्थना केली आहे. – नरेंद्र कराळे, अध्यक्ष टॅक्सी संघटना