Raigad News: अलीबाग शहरातील महामार्गाची दुरावस्था, वाहनचालकांचा खड्ड्यांतूनच प्रवास सुरु! नागरिकांनी व्यक्त केला संताप
Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
पावसाळ्यानंतर रस्त्यावरील खड्यांची तीव्रता अधिक वाढली असून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान, अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. तरीही प्रवासी जनतेला थोडासा दिलासा देण्यासाठी तात्पुरती डागडुजी करण्याची तसदीही प्रशासन घेत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य महामार्ग असूनही संबंधित विभागातील अधिकाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आता केला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिल्हा प्रशासनानेही अद्याप या प्रकरणाकडे ठोस लक्ष दिलेले नाही. जिल्हाधिकारी स्तरावरून पाहणी किंवा तातडीचे आदेश निघत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. लोकप्रतिनिधींविषयी तर नागरिकांनी अपेक्षाच सोडून दिल्याची भावना व्यक्त होत असून, निवडणुकीच्या वेळी मतांची किंमत मोजून मतं विकत घेतली जातात. मात्र निवडणूक संपल्यानंतर जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे कोणीही फिरकत नाही, अशी टीका होत आहे.
कुरुळ बायपास-बेलकडे हा मार्ग अलिबाग शहराला तसेच तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा महत्वाचा राज्य महामार्ग आहे. पर्यटन, वाहतूक व दैनंदिन प्रवासासाठी हा रस्ता अत्यंत आवश्यक असतानाही त्याची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी केली आहे की, निविदा आणि कागदोपत्री कामापुरते न थांबता प्रत्यक्षात तातडीने खड्डे बुजविण्यात यावेत, रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी आणि तोपर्यंत तरी प्रवासी जनतेच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरती उपाययोजना करावी. अन्यथा येत्या काळात या रस्त्यावर मोठे अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






