
तटकरे कुटुंब विकास करणारे असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल हा विश्वास जनतेच्या मनात दृढ झाला आहे.त्यामुळेच दिवसेंदिवस विकास कामांची यादी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.ज्या प्रकारे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर व आदिती ताई यांच्यावर विश्वास टाकला त्याचप्रमाणे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणनिहाय निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सध्या मी महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक प्रचारात व्यस्त असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांनी घ्यावी,अशी भूमिका खासदार तटकरे यांनी मांडली. मेंदडी येथे यापूर्वी दोन्ही बाजूंनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकास करण्यात आला आहे. नव्याने महाराष्ट्र गृह विभाग, बंदरे व परिवहन सागरी मंडळामार्फत जेट्टी व पोच रस्ता बांधकामाची मंजुरी मिळवण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत तीन वेळा बैठका पार पडल्या त्यांचे सहकार्याचे खासदार तटकरे यांनी विशेष आभार मानले. म्हसळा तालुक्यात विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत खासदार सुनिल तटकरे यांचे वाजत-गाजत मिरवणूक काढून स्वागत केले. या प्रेमळ सत्काराबद्दल त्यांनी मनोमन आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव कांबळे यांनी केले. स्वागत व स्तुतीपर सुस्वर गीत प्रसिद्ध गीतकार विजय पायकोळी यांनी सादर केले.या भव्य कार्यक्रमास खासदार सुनिल तटकरे यांच्यासह निवासी नायब तहसीलदार शेखर खोत,गट विकास अधिकारी माधव जाधव,तालुका अध्यक्ष समीर बनकर,श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे,माजी सभापती महादेव पाटील,माजी सभापती बबन मनवे,उद्योगपती जमीरभाई नजीर,माजी सभापती छाया म्हात्रे,स्वप्नील बिराडी,गण अध्यक्ष मोरेश्वर पाटील, महिला अध्यक्षा मीना टिंगरे,मधुकर गायकर,गण अध्यक्ष अनिल बसवत, प्रसाद बोर्ले,नाना सावंत,महेश घोले, किरण पालांडे,लहू म्हात्रे,मंगेश म्हशीलकर,स्वप्नील चांदोरकर,मधुकर पाटील,नथुराम पयेर,लोमेश हरिचंद्र पाटील,विजयबुवा पायकोळी,रमेश डोळकर,चंद्रकांत भगत,अखंड कोळी समाज,आगरी समाज तसेच मेंदडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.