Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन

शहरात पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जातात.माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी माथेरान शहरात कायदेशीर लढाई लढल्यानंतर पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाल्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 23, 2026 | 03:42 PM
Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन
Follow Us
Follow Us:
  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का?
  • संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन
माथेरान/संतोष पेरणे : पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर माथेरान सर्वात महत्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणचं निसर्गसौैंदर्य टिकून रहावं याकरिता पर्यावरण पुरक अशा ई रिक्षाचा वापर करावा असं कोर्टाकडून सांगण्यात आलं. आतापर्यंत माथेरानमध्ये हातरिक्षा मोठ्या प्रमाणात होत्या. मात्र यात शारीरिक कष्ट जास्त असल्याने ई रिक्षाला न्यायालयाने परवानगी दिली.  मात्र असं असून देखील ई रिक्षा वापरल्या जात नाहीत.

शहरात पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जातात.माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी माथेरान शहरात कायदेशीर लढाई लढल्यानंतर पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाल्या.मात्र उर्वरित ७४ हातरिक्षा चालक यांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र माथेरान सनियंत्रण समितीकडून केवळ २० हातरिक्षा चालक यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात यावी असे आदेश दिले आहेत. मात्र हा निर्णय मान्य नसल्याने माथेरान शहरातील श्रमिक रिक्षा संघटना यांनी आज २३ फेब्रुवारी पासून पर्यावरण पूरक ई रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याच समस्येवर संतप्त रिक्षाचालकांनी  हे आंदोलन सुरू केले. त्यामुळे माथेरान सनियंत्रण समिती आणि शासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माथेरान मध्ये २०२२ मध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाली. सुरुवातीला सात रिक्षा यांचा पायलट प्रकल्प संपल्यानंतर आता २० अशा पर्यावरण पूरक ई रिक्षा माथेरान मध्ये हात रिक्षा चालक यांच्या हाती देण्यात आल्या आहेत. त्या निर्णयास तब्बल आठ महिने पूर्ण झाले. सुप्रीम कोर्टाने माथेरानमधील सर्व हात रिक्षा चालक यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात यावी आणि त्याने पुनर्वसन करण्यात यावे असा निर्णय दिला. सहा महिन्याच्या आत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश दिला आहे. मात्र हा निर्णय देऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून माथेरान मधील हातरिक्षा चालक यांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटना यांनी एक पर्यावरण पूरक ई रिक्षा बंद ठेवून आंदोलन सुरू केले. त्यावेळी महसूल अधीक्षक, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या विनंतीनंतर दोन दिवसांसाठी ही आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

Matheran News : वन विभागाच्या मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण; बेकायदा जमीन वापरणाऱ्यांना अभय कोणाचं ?

१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत माथेरानमध्ये आणखी २० ई रिक्षा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यात खरोखर हात रिक्षा ओढणारे १३ हातरिक्षा चालक यांना त्या २० मधील १३ हातरिक्षा देण्याचा आणि उर्वरित सात ई रिक्षा या हातरिक्षा यांचे लायसन्स असलेल्या हातरिक्षा चालक यांना देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र हा निर्णय श्रमिक रिक्षा संघटना यांना मान्य नसल्याने आज २३ फेब्रुवारी पासून माथेरान मधील सर्व पर्यावरण पूरक ई रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजपासून पुढचे काही दिवस जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोवर शहरातील सर्व ई रिक्षा बंद राहणार असून बेमुद आंदोलन करण्यात येत आहे.

मात्र या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका हा विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसणार आहे.सध्या दहावीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाता यावे, यासाठी पर्यावरण पूरक ई रिक्षा मदतगार ठरत होत्या. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी देखील या पर्यावरण पूरक ई रिक्षा बंदमुळे अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

Karjat News : कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

शकील पटेल,अध्यक्ष श्रमिक रिक्षा संघटना
आमच्या सर्व ९४ हातरिक्षा चालक यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा मिळाव्या अशी आमची मागणी आहे.त्याचवेळी माथेरान मधील हात रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.त्यामुळे सर्व हातरिक्षा चालक यांना न्याय देण्यासाठी आमचे आंदोलन सुरू झाले आहे.

शकील पटेल,उपाध्यक्ष श्रमिक रिक्षा संघटना
माथेरान शहरात ९४ बिल्ले धारी हातरिक्षा चालक आहेत,त्यात वारसानुसार काही महिला देखील असून आतापर्यंत केवळ २० हात रिक्षा चालक यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा मिळाली आहे.सर्वांचे हातरिक्षा ओढण्याचे श्रम कमी करण्यासाठी शासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.

सुनील शिंदे, सचिव श्रमिक रिक्षा संघटना
आम्ही १० फेब्रुवारी रोजी माथेरान मध्ये ई रिक्षा बंद ठेवण्याचे आंदोलन सुरू केल्यावर सनियंत्रण समितीने १२ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन आणखी २० ई रिक्षा यांना मंजुरी दिली आहे.मात्र ती मंजुरी देताना गुजरात राज्यातील देवाडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रमाणे नगरपरिषदेने या ठिकाणी ई रिक्षा खरेदी करून द्यावी आणि त्यानुसार श्रमिकांचे श्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही.  आमचे हात रिक्षा चालक सक्षम असून ते पर्यावरण पूरक ई रिक्षा कर्ज काढून घेऊ शकतात आणि त्यामुळे आम्हाला ड्रायव्हर म्हणून ई रिक्षा नको. दुसरीकडे आम्ही सर्व हात रिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्याची मागणी केली आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आमच्या मागणीवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत ई रिक्षा बंद राहतील.

 

Web Title: Matheran news why are e rickshaws banned even after the supreme courts decision angry rickshaw drivers indefinite protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • karjat news
  • matheran news
  • Raigad News

संबंधित बातम्या

मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्यासह 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; राज ठाकरेंच्या पक्षात खळबळ
1

मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्यासह 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; राज ठाकरेंच्या पक्षात खळबळ

Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप
2

Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

Raigad Zilla Parishad : रायगड जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा घोटाळा? अंगणवाडी सोलर प्रकल्पात २.५ कोटींच्या अपहाराचा आरोप
3

Raigad Zilla Parishad : रायगड जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा घोटाळा? अंगणवाडी सोलर प्रकल्पात २.५ कोटींच्या अपहाराचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.