
कर्जत/ संतोष पेरणे : जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी मसाले महत्त्वाचे आहेत. मसाल्याच्या पदार्थांसाठी कर्जतचे बाजारात मिळणारी मिरचीला महिलांची पसंती असते. त्यामुळे गेल्या १०० वर्षांपासून कर्जत येथील बाजारपेठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची आणि मसाले खरेदी करण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे महिला वर्गाची या ठिकाणी मिरची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे.
हल्ली तयार मसाले बाजारात मिळत असले तरी मिरची खरेदी करून मसाल्याचे पदार्थ त्यात टाकून तिखट मसाला बनविण्याची परंपरा कायम आहे. ज्यांना कर्जतच्या मसाल्याची सवय आहे अशी कुटुंब वर्षभरासाठी मसाला तयार करून ठेवतात. ग्रामीण भागात लग्न सोहळ्यासाठी भोजनाला चांगली चव यावी लग्नकार्य ज्यांचे घरी आहे अशा कुटुंबात साधारण वीस ते पंचवीस किलो मसाला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. हा बाजार चार ते पाच महिने असतो आणि त्यात सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल होत असते.कर्जत शहरात आजही दूर दुरच्या ग्राहकांची पहिली पसंती ही पंकज ट्रेडर्स या दुकानाला असून जयंतीलाल जुहारमल परमार यांचे नाव खात्रीचे विक्रेते म्हणून कायम आघाडीवर राहिले आहे.
थंडी कमी झाली की मिरची विकत घेण्यासाठी अगदी पेण, अलिबाग, पनवेल, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, लोणावळा, पुणे येथूनच नव्हे तर मुंबईतूनही ग्राहक येत असतात. परदेशातही आपल्या नातेवाईकांना कर्जत मधून मिरची घेऊन मसाला तयार करून पाठवण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. यंदा किंमतीच्या बाबतीत मिरची खूपच ‘तिखट’ झाली आहे परंतु तरीही मिरची व खडे मसाले घेण्यासाठी बहुतांश दुकानात ग्राहकांची गर्दी असते.
100 वर्षाची परंपरा..
सुमारे नव्वद – पंचांण्णव वर्षांपासून कर्जतचा मिरची बाजार भरतोय. कर्जत शहरातील महावीर पेठेत 10 – 12 दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. आज शहरातील बाजारपेठेत दुकानांची संख्या कमी झालेली आहे,मात्र कर्जतचे बाजारातील मिरची ही महिला वर्गात अधिक प्रिय आहे. हैदराबाद – वारंगल, आंध्रप्रदेश – गंटूर, तेलंगणा आदी राज्याच्या अनेक भागातून मिरची या बाजारात येत असते. जयंतीलाल परमार,मदन परमार, शिवलाल गुप्ता हे व्यापारी आपल्या तीन – चार पिढ्यांपासून हा मिरचीचा व्यापार करतात. काही छोटे व्यावसायिक देखील व्यवसाय करतात.
सुरेखा फुलावरे.. ग्राहक चौक
मी चौक खालापूर येथे बाजारपेठ असून देखील कर्जत येथे मिरची आणि मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी येते.आम्ही पंकज ट्रेडर्स मध्ये गेली 15 वर्षे मसाल्याचे पदार्थ खरेदी करून असून आमची एकदाही फसवणूक झालेली नाही आणि चांगलाच माल या ठिकाणी मिळाला आहे.
वैशाली विजय पिंगळे
ग्राहक गौरकामत..
आम्ही दरवर्षी एकदाच तिखट मसाला बनवत असतो आणि आमच्या सारख्या अनेक महिला एकदाच मसाला कुटून घेतात. आम्ही कर्जत मध्ये येवून मिरची खरेदी करून आणि येथील मिरची देखील खात्री असते.
जयंतीलाल परमार.. व्यापारी
मी 80 वर्षाचा असून 60 वर्षे कर्जत शहरात मिरची विकत असून जनतेचा विश्वास आम्ही मिळविला आहे.मात्र आमच्या नंतर पुढील पिढी या व्यवसाय करीलच याची खात्री नाही.तरी देखील पंकज,सचिन ही दोन्ही मुलं आणि सुनीता,टिना या दोन्ही सूना मदतीला असतात.त्यामुळे वर्षाकाठी 800पोती मिरची विकण्यास मदत होते.एवढी वर्षे खात्रीने आणि सचोटीने व्यवसाय करीत असल्याने 15 तास मिरचीचे समोर असून देखील मी 80वर्षाचा असून देखील आजारी पडत नाही.
मिरची प्रति किलो दर
गंटूर मिरची – 230-360रुपये
लवंगी मिरची – 160-180रुपये
बेडगी मिरची – 250-260रुपये
काश्मिरी मिरची- 300-450
संकेश्वरी मिरची – 200-280 रुपये
पट्टी मिरची -230-320 रुपये  अशा विविध मिरच्या तसंच विविध प्रकारचे  खडे मसाले घेण्यासाठी  ग्राहकांची मोठी गर्दी जमा होते.