Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metro Line 5: कल्याणनंतर आता उल्हासनगरलाही मेट्रो कनेक्टिव्हिटी; मेट्रो ५ चा विस्तार शांतीनगरपर्यंत, श्रीकांत शिंदेंनी दिली माहिती

Metro Line 5: उल्हासनगरकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर मेट्रोची भेट मिळाल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे. मेट्रो ५ अंतर्गत कल्याणनंतर उल्हासनगरच्या शांतीनगरपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2026 | 04:14 PM
कल्याणनंतर आता उल्हासनगरलाही मेट्रो कनेक्टिव्हिटी; मेट्रो ५ चा विस्तार शांतीनगरपर्यंत, श्रीकांत शिंदेंनी व्हिडीओ कॉलद्वारे दिली माहिती

कल्याणनंतर आता उल्हासनगरलाही मेट्रो कनेक्टिव्हिटी; मेट्रो ५ चा विस्तार शांतीनगरपर्यंत, श्रीकांत शिंदेंनी व्हिडीओ कॉलद्वारे दिली माहिती

Follow Us
Follow Us:
  • उल्हासनगरकरांना दिवाळीची मेट्रो भेट!
  • शिवसैनिकांचा फटाके फोडून जल्लोष
  • खासदार श्रीकांत शिंदेंचा व्हिडीओ कॉल
 

Metro Line 5: कल्याण-उल्हासनगर परिसरातील नागरिकांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी समोर आली आहे. मेट्रो ५ प्रकल्पांतर्गत कल्याणनंतर उल्हासनगरच्या शांतीनगरपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासदार कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. (Metro Line 5)

श्रीकांत शिंदेंचा शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

या आनंदोत्सवादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे उल्हासनगरमधील नगरसेवक आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रो प्रकल्पाबाबतची माहिती दिली. कल्याणनंतर उल्हासनगरच्या शांतीनगरपर्यंत मेट्रो पोहोचणार असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच मेट्रोचा विस्तार पुढे बदलापूरमधील चिखलोलीपर्यंत करण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

Ulhasnagar News: सुभाष टेकडी परिसरात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; उलट्या, जुलाबाच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीती

ठाणे ते उल्हासनगर शहरांना मेट्रोने जोडण्याचे नियोजन

मेट्रो ५ हा मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांना मेट्रोच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. विशेषतः कल्याण आणि उल्हासनगर परिसरात दररोज नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मेट्रोचा फायदा मिळू शकतो. रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासोबतच या शहरांमधील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

४,५३४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध

मेट्रो ५ च्या विस्तारित भागाच्या उभारणीसाठी एकूण ४,५३४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या विस्तारित मार्गामुळे कल्याणनंतर उल्हासनगर आणि पुढे परिसरातील अन्य शहरांनाही मेट्रो नेटवर्कशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.

बदलापूरच्या चिखलोलीपर्यंत मेट्रो विस्ताराची तयारी

उल्हासनगरपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळण्यासोबतच बदलापूरच्या चिखलोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याबाबतही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे भविष्यात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, मेट्रो ५ च्या विस्तारित मार्गामुळे कल्याण-उल्हासनगरसह संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मेट्रो भेटीच्या घोषणेनंतर उल्हासनगरमधील शिवसैनिकांनी दिवाळीपूर्वीच फटाके फोडून आनंद साजरा केला.

Pradeep Purnekar Case : ज्यांच्यावर आरोप झाले, त्याच मिनाक्षी शिंदेंनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लिहिलं पत्र!

💡

Frequently Asked Questions

  • Que: उल्हासनगरमध्ये मेट्रो कुठपर्यंत येणार आहे?

    Ans: मेट्रो ५ अंतर्गत कल्याणनंतर उल्हासनगरमधील शांतीनगरपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी असणार आहे.

  • Que: उल्हासनगरमधील मेट्रोच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी कसा आनंद साजरा केला?

    Ans: महापौर अश्विनी निकम यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासदार कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

  • Que: मेट्रोचा विस्तार पुढे कुठपर्यंत करण्याचे नियोजन आहे?

    Ans: खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरनंतर मेट्रो बदलापूरमधील चिखलोलीपर्यंत जोडण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

Web Title: Ulhasnagar metro 5 diwali gift shiv sena celebration shrikant shinde sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Metro
  • Shiv Sena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ! सोमवारपासून ४६ अतिरिक्त फेऱ्या, प्रवाशांना दिलासा
1

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ! सोमवारपासून ४६ अतिरिक्त फेऱ्या, प्रवाशांना दिलासा

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर
2

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

Maharashtra Politics: महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे; आनंद परांजपे यांचे आवाहन
3

Maharashtra Politics: महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे; आनंद परांजपे यांचे आवाहन

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला
4

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.