Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray News: साधुंच्या नावाखाली लाडक्या उद्योगपतींच्या घशात जमीन;तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 29, 2025 | 12:27 PM
Raj Thackeray News: साधुंच्या नावाखाली लाडक्या उद्योगपतींच्या घशात जमीन;तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
Follow Us
Close
Follow Us:
  • तपोवनातील १८०० झाडे तोडण्याचा निर्णय
  • राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
  • जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम सुरू असल्याची राज ठाकरेंची टीका
 

 Nashik News:  नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने तपोवनातील १८०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून नाशिकसह राज्य भरातून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील ११५० एकर जमिनीवर साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच या १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नाशिकमधील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तपोवनातील वृक्षतोडीविरोधीत नाशिकचे नागरिक, पर्यावरण प्रेमींसह अनेक सेलिब्रिटीही रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)  यांनीदेखील या वृक्षतोडीला विरोध केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray)  यांनीदेखील एक फेसबुक पोस्ट करत राज्य सरकारचे वाभाडे काढले आहेत.

नोकरीवरून काढून टाकल्यास मिळणार 15 दिवसाचा Extra पगार, 45 दिवसात खात्यात जमा होणार पूर्ण रक्कम; काय आहे नवा नियम

वाचा,  काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टमध्ये?

“आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ? बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो.

आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत !

वयाच्या 70 व्या वर्षी महिलेने IVF द्वारे दिला बाळाला जन्म, वाढत्या वयात आयव्हीएफ ट्रीटमेंट यशस्वी ठरते का?

नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच ! ”

राज ठाकरे

 

Web Title: Raj thackeray criticizes efforts to give tapovan land to industrialists in the name of saints

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • MNS Chief Raj Thackeray
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik Election 2026 : नाशिकमध्ये फिरलं वारं! भाजपला बसला मोठा धक्का, बडगुजर यांना उमेदवारी देणं फायद्यात की तोट्यात?
1

Nashik Election 2026 : नाशिकमध्ये फिरलं वारं! भाजपला बसला मोठा धक्का, बडगुजर यांना उमेदवारी देणं फायद्यात की तोट्यात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.