औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत सापडले आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीनंतर राज ठाकरे १२ अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच भडकाऊ भाषणाचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान राज ठाकरेंवर कलम, ११६, ११७, १३५, १५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अटकेची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?
“राज ठाकरे यांच्यावर दबाव निर्माण करुन महाराष्ट्र सैनिकांवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यावेळी सभा घेण्यावर अटी लादल्या होत्या. त्यामुळे असे गुन्हे दबाव निर्माण करण्यासाठी दाखल होणार याची आम्हाला कल्पणा होती. पण आम्ही या गोष्टीला घाबरत नाही. गेली १६ वर्ष आम्ही संघर्ष करतो.आम्ही कायद्याने देखील संघर्ष केला आहे, रस्त्यावर देखील संघर्ष केला आहे”.
[read_also content=”कायदा तोडणारा कोणीही असो राज्य सरकार कारवाई करेल!: नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/whoever-breaks-the-law-the-state-government-will-take-action-nana-patole-nrdm-275665.html”]
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्यासाठी अल्टिमेट दिला आहे. अन्यथा सर्व हिंदू या धार्मिक स्थळांच्या बाहेर हनुमान चालीसा वाजवतील, असेही ते म्हणाले होते. उत्तर प्रदेश सरकार लाऊडस्पीकर काढू शकते तर महाराष्ट्र सरकार का काढू शकत नाही, असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. ४ मे मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या मुदतीनंतर जे होईल त्याला मी जबाबदार नाही, असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.