Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंना जामिन मिळेल अशी कलमं लावली; इम्तियाज जलील यांचा आरोप

इम्तियाज जलील म्हणाले, भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नाहीत का? फक्त दाखवण्यासाठी राज ठाकरेंवर कारवाई नको. राज ठाकरेंना सहज जामिन मिळेल अशी कलमं दाखल केली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 03, 2022 | 08:19 PM
राज ठाकरेंना जामिन मिळेल अशी कलमं लावली; इम्तियाज जलील यांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज ठाकरेंवर दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कलम ११६, ११७, १३५ आणि १५३ अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरेंना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान या प्रकरणी इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील म्हणाले, भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नाहीत का? फक्त दाखवण्यासाठी राज ठाकरेंवर कारवाई नको. राज ठाकरेंना सहज जामिन मिळेल अशी कलमं दाखल केली आहेत. आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी ही कलमे लावली आहेत. राणांप्रमाणे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला नाही? पोलिसांनी अशी थातूर मातुर कलमं का केली?, असा थेट सवाल त्यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.

[read_also content=”कोळी बांधवांच्या प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करणार; राज्यपाल कोश्यारी यांचे कोळी महिलांना आश्वासन https://www.navarashtra.com/maharashtra/koli-will-follow-up-with-the-government-on-the-issues-of-the-brothers-governor-koshyaris-assurance-to-koli-women-nrdm-275743.html”]

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत भाषण सुरु असताना, मध्येच अजान वाजलं होत. यावर संतापून राज ठाकरे म्हणाले, “जर हे सभेच्य वेळेला भांग देणार असतील, भांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. जर यांना सहज आणि सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहिती नाही. पोलिसांनी आताच्या आता जाऊन हे बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून जर समजात नसेल, महाराष्ट्राचं मनगटात काय टाकत आहे हे यांना दाखवावंच लागेल. माझी पोलिसांना विनंती आहे की, या लोकांची थोबाडं बंद करा. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेले पाहिजेच. अभी नही तो कभी नही.” या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Raj thackeray was granted bail allegation of imtiaz jalil nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2022 | 08:19 PM

Topics:  

  • aurangabad
  • cmomaharashtra
  • MNSRaj Thackeray

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन
2

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
3

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
4

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.