Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकोटमध्ये पुन्हा उभारण्यात आला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनावरण सोहळा पार

Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj new Statue : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाल्यानंतर तिथे नवीन भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले.

  • By प्रीति माने
Updated On: May 11, 2025 | 05:27 PM
Rajkot malvan Chhatrapati Shivaji Maharaj new grand statue unveiled by CM Devendra Fadnavis

Rajkot malvan Chhatrapati Shivaji Maharaj new grand statue unveiled by CM Devendra Fadnavis

Follow Us
Close
Follow Us:

रायगड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथे भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मालवणमधील राजकोट येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये पुतळा पूर्णपणे कोसळला होता. यानंतर राज्य सरकारकडून पूर्ण काळजी घेऊन आणि अनुभवी शिल्पकारांच्या मदतीने नवीन पुतळा उभारण्यात आला. कोकणातील या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले आहे.

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा उभारण्यात आलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नवीन उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी राजकोटमध्ये पुतळा पडण्याच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच ठिकाणी पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राजकोटमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शिल्पकार राम सुतार यांनी अतिशय सुंदर पुतळा बनवला आहे. कोकणाला वेगवेगळ्या प्रकारच्या चक्रीवादळांचा फटका बसतो. वादळे येतात. या सर्वांचा अभ्यास करून ते बनवण्यात आले आहे. जरी जोरदार वारा किंवा वादळ आले तरी पुतळा उभा राहील. हा पुतळा सुमारे ९१ फूट उंच आहे. त्याचा पाया १० फूट उंच आहे.  तसेच हा महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जय शिवाजी जय भवानी🚩

LIVE | किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन

🕝 दु. २.४० वा. | ११-५-२०२५ 📍 सिंधुदुर्ग.#Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/BfZ7gTfRUl

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 11, 2025

“या पुतळ्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती कोणत्याही वातावरणात किमान पुढील १०० वर्षे टिकेल. ज्यांनी हा पुतळा बनवला आहे ते पुढील १० वर्षे त्याच्या देखभालीची जबाबदारी घेतील. या संदर्भात त्यांनी हमी घेतली आहे. आजूबाजूच्या परिसराचे लवकरच नूतनीकरण केले जाईल. पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अनुभव घेता यावा यासाठी या ठिकाणी काम केले जाईल.  लवकरच या भागाचा विकास केला जाईल,” असे आश्वासन राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

कोकणच्या विकासासाठी काम सुरू

पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “मंत्री नितेश राणे यांनी आजूबाजूच्या जमीन मालकांशी या विषयावर चर्चा केली आहे. यावेळी महायुतीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कोकणाला अधिक महत्त्व देण्यात आले. कोकणच्या विकासासाठी अजूनही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आठवण करून दिली की अलिकडेच मच्छिमारांना शेतकऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा देण्यात आला आहे,’ असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर फडणवीस म्हणाले की, “पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाच्या नियमांनुसार सर्व खबरदारी घेतली जात आहे”

Web Title: Rajkot malvan chhatrapati shivaji maharaj new grand statue unveiled by cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  • Rajkot Incident

संबंधित बातम्या

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
1

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
2

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार
3

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार

राजकीय नेत्यांच्या कामाचा वाढला ताण; थेट बायकोलाच विसरले शिवराज सिंह चौहान
4

राजकीय नेत्यांच्या कामाचा वाढला ताण; थेट बायकोलाच विसरले शिवराज सिंह चौहान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.