अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केल्यामुळे संजय राऊत आक्रमक झाले (फोटो - istock)
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. मात्र या युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यामुळे अनेक भारतीयांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताबाबत अमेरिकेने निर्णय घेतल्यामुळे ही नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत आणून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युद्धबंदीच्या घोषणेवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येते. हे चुकीचं आहे. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प यांचा सबंध काय? माणसं आमची मेली मग, ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थीत कोणत्या अधिकाराने करतात. भारत स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्ध बंद करतो. कोणत्या आधारावर आणि अटी शर्थीवर बंद केला ते सांगा, असा शब्दांत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
अकलेचे दिवे पाजळणाऱ्या भारताच्या प्रधानमंत्रींना…
पुढे संजय राऊत म्हणाले की, न्यूक्रेल आणि रशियाच्या युद्धामध्ये मोदींनी जाहिरात केली होती की पापाने वॉर रुका दिया. आता अमेरिकेच्या पापाने वॉर थांबवला का? पूर्ण बदला घेणार पाकिस्तानचे तुकडे करणार ही भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती. आता पाकिस्तानचे तुकडे कुठे गेले? भारताची जगामध्ये बेअब्रू झालेली आहे. पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीचा स्टेटमेंट आम्ही युद्ध जिंकलो. अकलेचे दिवे पाजळणाऱ्या भारताच्या प्रधानमंत्रींना हे शोभत नाही. कोणत्या अटी शर्ती वर तुम्ही युद्ध थांबवलं. यासाठी सर्व पक्ष बैठक घ्यावी आणि त्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहणार हे आवश्यक आहे. त्यांना पळ काढता येणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
अमित शहा ट्रम्प कडे जाऊन रडत आहेत का?
युद्धबंदीची खरच गरज होती का? कराची सह इतर ठिकाणी बॉम्ब टाकले असे सांगत होते मग माघार घ्यायची गरज का? ही वेळ पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची होती. भारतीय सैन्याचा मनोबल उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली प्रेसिडेंट ट्रम्पसाठी सैन्याचा आणि देशाचे मनोबल उध्वस्त केलं. गुजरातचे मुख्यमंत्री मोदी असताना 26/ 11 हल्ल्या वेळी हे सांगत होते की ओबामाकडे जाऊन हे रडतात, वाचवा म्हणून आता मोदी, अमित शहा ट्रम्प कडे जाऊन रडत आहेत का? भारत सरकारने काहीच केलं नाही. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे. नुकसान पाकिस्तानचा झालं नाही आमचं झालं आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोदी यांनी देशात सोबत विश्वासघात केला
ट्रम्पने इस्त्राईल व गांजा पट्टी युद्ध का नाही थांबवलं ? ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे आहेत. मात्र मोदींचे मित्र ट्रम्प भारताच्या मागे उभे राहिले नाही. दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत असे त्यांनी सांगितले. मोदी पाचशे देश फिरून आले मात्र भारताचा मित्र कोण त्यांनी सांगावं. या युद्धाला ठामपणे पाठिंबा देणारा एकही देश दाखवा. लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते. 1971 साली अमेरिकेच्या प्रेसिडेंट याला सांगितलं होतं तुम्ही कोणताही निर्णय घ्या आणि पाकिस्तान बरोबर युद्ध करणार आणि करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला पाहिजे. मोदी यांनी देशात सोबत विश्वासघात केला, अशी गंभीर शब्दांत खासदार संजय राऊक यांनी टीका केली आहे.